परळीत एस.टी. आगाराच्या कॅश सेक्शनला भीषण आग, 25 लाखांचं साहीत्य जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 10:12 IST2017-08-27T10:11:47+5:302017-08-27T10:12:32+5:30

परळी येथील बस आगारातील कॅश विभागास रात्री 1.30 च्या सुमारास भीषण आग लागली. त्यामध्ये जवळपास 25 लाखांचं साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे.

Paroli st A massive fire broke out in the cash segment, 25 lakhs of material burnt to pieces | परळीत एस.टी. आगाराच्या कॅश सेक्शनला भीषण आग, 25 लाखांचं साहीत्य जळून खाक 

परळीत एस.टी. आगाराच्या कॅश सेक्शनला भीषण आग, 25 लाखांचं साहीत्य जळून खाक 

बीड, दि. 27 - परळी येथील बस आगारातील कॅश विभागास रात्री 1.30 च्या सुमारास भीषण आग लागली. त्यामध्ये जवळपास 25 लाखांचं साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. परळी व आंबाजोगाई येथील अग्नीशमन जवानांनी 1 तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजूनपर्यंत आग लागण्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही मात्र, सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.   
आगीमध्ये तिकीटाच्या 80 मशीन, आतील इलेक्ट्रिकल साहित्य, मॅन्युअल पासेस आणि फर्निचर आदी जळून खाक झाल्याची माहिती परळी बस आगार प्रमुख राजपूत यांनी दिली. 

Web Title: Paroli st A massive fire broke out in the cash segment, 25 lakhs of material burnt to pieces