शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावला बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 23:28 IST

ज्योती देवरेंच्या तक्रारीत तथ्य न आढळल्यानं बदली

अहमदनगर: लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार करून आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली करण्यात आली. देवरे यांनी महिला आयोग आणि नाशिकच्या महसूल आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचा अहवाल समितीनं दिला. तर दुसरीकडे देवरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यानं त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला.

गेल्या महिन्यात देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यामध्ये होता. या प्रकाराला पुढे राजकीय वळणदेखील मिळालं. महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचा आदेश देण्यात आला. त्यासाठी महिला अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली. 

तर दुसरीकडे देवरे यांच्याविरुद्ध काही ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींचीही चौकशी झाली. देवरे यांच्याविरुद्धच्या चौकशीचा अहवाल आधीच आला आहे. त्यामध्ये देवरे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा, पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर महिला आयोगाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या चौकशीचा अहवालही आता प्राप्त झाला असून देवरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचं त्यात म्हटलं आहे.सरकारचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी सरकारच्या वतीनं देवरे यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. देवरे यांची पारनेरहून जळगाव जिल्ह्यात अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आलेलं नाही. मात्र, त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानं त्यांची बदली करण्यात येत आहे. हा आदेशच त्यांचा कार्यमुक्ती आदेश समजावा, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या जागी पारनेरला अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.​​​​​​​

हे तर आमदार, मंत्री, बगलबच्चे धार्जिणे सरकार- चित्रा वाघज्योती देवरेंच्या बदलीवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकार लोकधार्जीणे नाही तर यांचे आमदार मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहे. सरकारच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो, असं वाघ म्हणाल्या. देवरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाघ यांनी त्यांची भेट घेतली होती.