शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:27 IST

Parli Assembly Election 2024 Result Live Updates: महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे

Parli Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live  : बीड : विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. विशेष: मराठवाड्याच्या निकालाकडे. बीडच्या परळीमध्येधनंजय मुंडे विरूद्ध शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात मुख्य लढत बघायला मिळाली. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे अशी लढत बघायला मिळाली होती. मात्र, महायुतीमध्ये ही जागा धनंजय मुंडे यांच्याकडे गेली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. तर पंकजा मुंडे स्वत: धनंजय मुंडेंचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या.

आज सकाळी राज्यातील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काही दिग्गज आघाडीवर आहेत, तर काही पिछाडीवर पडले आहेत. परळीत धनंजय मुंडे हे ४००० मतांनी आघाडीवर आहे. तर राजेसाहेब देशमुख हे पिछाडावरी आहेत. दरम्यान, परळीत मतमोजणीसाठी एकूण १४ टेबल असून. मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या होणार आहेत.प्रत्येक मतमोजणी टेबलवर चार अधिकारी व कर्मचारी नियुक्त असून असे एकूण ५६ अधिकारी कर्मचारी हे काम पाहत आहेत. परळी मतदारसंघातील अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिल्या फेरीत धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत.

Watch Live blog 

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभेत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात लढत होवून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा ३० हजार ७०१ मतांनी पराभव केला होता. यावेळी ३ लाख ६ हजार ७१० मतदारापैकी २ लाख २४ हजार २७२ मतदारांनी हक्क बजावत ७३ टक्के मतदान झाले होते. यावेळी धनंजय मुंडे यांना १ लाख २२ हजार ११४ मतदान तर पंकजा मुंडे यांना ९१ हजार ४१३ मतदान पडले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ५ टक्के मतदान जास्त झाले असून यावेळी मुंडे परिवार एकत्र आहे. यामुळे निकाल काय लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडे यांच्या जमेच्या बाजू : गेल्या बावीस वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य ते कृषी मंत्री या पदाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघात कार्यकर्ते, मतदारांशी असलेला थेट संपर्क, केलेली  विकासाची कामे, लोकांचे सोडविलेलेलेले प्रश्न तसेच त्यांची  प्रचाराची व कामाची  यंत्रणा चांगली होती. ओबीसी समाज धनंजय मुंडे यांच्या बाजूने एकवटला गेला. तसेच भाजपाचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची साथ धनंजय मुंडे यांना मिळाली आहे.

राजेसाहेब देशमुख यांच्या जमेच्या बाजू :राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांची साथ, महाविकास आघाडीच्या परळीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले काम. मराठा चेहरा म्हणून राजकीय क्षेत्रात परळी मतदारसंघात आलेले महत्व. बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापतीपद भूषविल्यामुळे मतदारांशी जवळून संपर्क.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Beedबीडparli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारण