परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना बजावली कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:04 IST2025-02-13T08:04:35+5:302025-02-13T08:04:58+5:30
मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात त्या मिळकतीचा उल्लेख नसल्याचा आरोप

परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना बजावली कारणे दाखवा नोटीस
छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाइन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याबाबत २४ फेब्रुवारी २०२५ रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटले आहे.
मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि ३ मुली तसेच करुणा मुंडे यांच्या २ मुलांचा उल्लेख केला होता. मात्र, करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता.