शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 07:16 IST

मुदखेड तालुक्यातील जवळामुरार येथे गुरुवारी सकाळी ही भीषण घटना उघडकीस आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. एका आत्मघाती निर्णयाने संपूर्ण कुटुंबच संपून गेले.

- नामदेव बिचेवारलोकमत न्यूज नेटवर्कबारड (नांदेड) : गुरुवार २५ डिसेंबरची पहाट मुदखेड तालुकाच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्याला हादरवणारी ठरली. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्मघात केला. आई-वडील घरात फासावर लटकले, तर कुटुंबातील दोन तरण्याबांड पोरांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. 

या थरारक घटनेमागे पोलिस प्रथमदर्शनी आर्थिक संकट आणि कुटुंब प्रमुख वडिलांचा आजाराशी २५ वर्षांपासूनचा संघर्ष हे कारण सांगत आहेत. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच खरे काय ते स्पष्ट होईल. आई-वडील स्वत:हून फासावर लटकले की मुलांनी आधी त्यांना फासावर लटकवून नंतर स्वत:ही जीवनयात्रा संपविली, यावर पोलिस तपासाचा फोकस आहे. या घटनेमागे घातपात तर नाही ना, अशी शंकाही पोलिसांकडून तपासून पाहिली जात आहे.मुदखेड तालुक्यातील जवळामुरार येथे गुरुवारी सकाळी ही भीषण घटना उघडकीस आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. एका आत्मघाती निर्णयाने संपूर्ण कुटुंबच संपून गेले.

मुलांचे मृतदेह पाहताच गावकरी धावले घराकडेबजरंग लखे (२२) आणि उमेश लखे (२६) या मुलांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानक क्षेत्रात ट्रॅकवर कटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांची ओळख पटल्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. घरात रमेश होनाजी लखे (५२) आणि त्यांची पत्नी राधाबाई रमेश लखे (४८) हे आई-वडील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. 

वडिलांचा दीर्घ आजार, त्यातून बिघडलेली आर्थिक स्थिती, गरीब परिस्थिती ही कारणे प्रथमदर्शनी या घटनेमागे पुढे आली आहेत. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल. विविध अंगांनी या घटनेचा तपास करीत आहोत. आत्महत्या की घातपात या जनतेतील शंकेच्या दिशेनेही तपास केला जात आहे.     अबिनाश कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक, नांदेड

जवळामुरार गावात एका छोट्या मातीच्या घरात लखे कुटुंब वास्तव्याला होते. रमेश लखे २५ वर्षांपासून हृदयाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली आहे. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्याही कमकुवत झाले होते. परिवाराने आपली चार एकर शेती मक्ता बटाईने लावून दिली होती. राधाबाई लखे या शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. बजरंग हा दुकानात तर उमेश मंडप डेकोरेशनचे काम करायचा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Poverty drives family of four in Nanded to take their lives.

Web Summary : A family in Nanded, burdened by poverty and illness, tragically ended their lives. Parents hanged themselves, while their two young sons died by suicide on a railway track. Police investigate possible foul play.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी