Parents, beware! Don't fall prey to fee concessions | पालकांनो, सावधान! शुल्क सवलतीला बळी पडू नका

पालकांनो, सावधान! शुल्क सवलतीला बळी पडू नका

मुंबई : पालकांनो, सावधान! कोणत्याही एनजीओने दिलेल्या शुल्क सवलतीच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन मुंबई उपसंचालक कार्यालयाने केले. काही पैसे भरल्यास पहिली ते दहावीच्या शिक्षणापर्यंत शुल्कात सवलत मिळेल, असे सांगणारी एक खासगी एनजीओ सध्या पालकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून या एनजीओला परवानगी मिळाली असून, पालकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही संस्था करत आहे. त्याद्वारे त्यांची वैयक्तिक माहिती आणि नोंदणी शुल्क जमा करत असल्याच्या तक्रारी दक्ष पालकांनी मुंबई उपसंचालक कार्यालयाला केल्या. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद तुळसकर, काही पालकांनी प्राईड या संस्थेची माहिती उपसंचालक कार्यालयाला दिली.

अफवांवर विश्वास ठेवू नका
प्राईड ही एनजीओ नसून, खासगी संस्था आहे. या संस्थेच्या पोस्ट सोशल मीडियावर वेगाने पसरत असल्या, तरी त्या खोट्या आहेत. पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. भविष्यात या संस्थेकडून पालकांची आर्थिक फसवणूक झाल्यास उपसंचालक कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे मुंबई विभागीय उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Parents, beware! Don't fall prey to fee concessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.