उस्मानाबाद- मुलीची छेड का काढली? असं विचारलं म्हणून आई-वडिलांनाच केली जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 10:44 IST2018-04-02T10:23:14+5:302018-04-02T10:44:41+5:30

उमरगामधील मळगी इथे एका सतरा वर्षीय तरुणीची छेड काढल्याची घटना घडली.

parents beaten up for asking question to molestore | उस्मानाबाद- मुलीची छेड का काढली? असं विचारलं म्हणून आई-वडिलांनाच केली जबर मारहाण

उस्मानाबाद- मुलीची छेड का काढली? असं विचारलं म्हणून आई-वडिलांनाच केली जबर मारहाण

उस्मानाबाद- उमरगामधील मळगी इथे एका सतरा वर्षीय तरुणीची छेड काढल्याची घटना घडली. या छेडछाडीचा जाब मुलीच्या आई-वडिलांनी विचारल्याने त्यांनाच आरोपीकडून जबर मारहाण झाल्याची माहिती मिळते आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांना आठ जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत मुलीचे आई-वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, आठ जणांविरूद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सकाळी मुलाच्या वडिलांना जाब विचारायला गेले असता उपस्थित इसमांनी मुलीच्या आई-वडिलांना मारहाण केली. मुलीच्या तक्रारीनंतर भीमाशंकर माने, पांडुरंग बनसोडे, विपुल पाटील, विश्वनाथ माने, उषाबाई माने, अनिता मुरमे, चमाबाई माने, ऋषिकेश माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

मुलीची छेड का काढली? असा सवाल मुलीच्या आई-वडिलांनी विचारला होता. पण यावर उत्तर न देता उलट त्यांनाच मारहाण झाली. हंटर व सळईने त्यांना मारहाण झाल्याचं समजतं आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली.  दरम्यान, मुलीच्या आई-वडिलांना मुलीला शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी गाव सोडून जाण्याचंही ठरवलं असल्याचं समजतं आहे. 

 

Web Title: parents beaten up for asking question to molestore