शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

हुबळी स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन? तपासासाठी पोलीस रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 8:59 PM

कोल्हापूरला जात असलेल्या पार्सलचा हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट

कोल्हापूर : कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर झालेल्या भीषण स्फोटाच्या कोल्हापूर कनेक्शनची शक्यता असल्याने जिल्ह्यांत ‘हाय अर्लट’ राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी दिले. स्थानिक दहशतवादी विरोधी पथक आणि बॉम्बशोध पथकाच्या काही तज्ज्ञांची टीम रात्री तातडीने हुबळीला रवाना झाली. कर्नाटकच्या हुबळी रेल्वे स्टेशनवर सोमवारी भीषण स्फोट झाला. अज्ञात वस्तूचा अचानक स्फोट होऊन दोघेजण जखमी झाले. ज्या पार्सलचा स्फोट झाला ते तामिळनाडूमधून कोल्हापूरला येत होते. परंतु ते अज्ञातस्थळी पडलेले पार्सल आरपीएफच्या पथकाच्या हाती लागले आणि त्याचा स्फोट झाला. पार्सलवर राजकीय संदेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोल्हापूरात मोठा घातपात घडवण्याचा कट असल्याचा प्राथमिक अंदाज कर्नाटक पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस सर्तक झाले आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्थानके, मंदिर, मज्जिद आदी ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला असून महामार्गासह शहराला जोडणाऱ्या सर्व नाक्यांवर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. दोन दिवसापूर्वी उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली स्फोटकांचा अ‍ॅल्युमिनिअमच्या डब्याचा स्फोट होऊन ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) यांचा हकनाक बळी गेला. पिशव्यांमध्ये भरलेले वाळूचे खडे, गारगोट्या, तांब्याची केबल, सुतळ्या, रासायनिक पावडर, पुंगळी आदी दारूगोळ्याचे साहित्य पुलाच्या शेजारील नाल्यामध्ये मिळून आले होते. याप्रकरणी हातकणंगले येथील तिघा संशयितांकडे चौकशी सुरु आहे. या स्फोटाचे कर्नाटक कनेकशन असलेच्या संशयावरुन हैद्राबाद येथील दहशतवादी पथकाने उजळाईवाडी परिसरात भेट देवून माहिती घेतली होती. हा तपास सुरु असतानाच सोमवारी कर्नाटकच्या हुबळी रेल्वे स्टेशनवर आंध्रप्रदेशमधील अमरावतीहून हुबळीकडे येणाऱ्या रेल्वे डब्यामध्ये पोलिसांना एक बकेट सापडले. त्यांनी ते आरपीएफ जवानांच्या हातात दिले. त्या जवानांनी ते बकेट उघडले असता त्यामध्ये लिंबूच्या आकाराचे बॉल होते. त्यातला एक हातात घेताना स्फोट झाला. त्यामध्ये जवानाच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. त्या पार्सलवर राजकीय संदेश मिळून आला. हे पार्सल तमिळनाडूहून कोल्हापूरला येणार होते. परंतु ही अमरावती-हुबळी रेल्वे कोल्हापूरला येत नसल्याने ते हुबळी रेल्वे स्टेशनवरचे पोलिसांना मिळून आले. उजळाईवाडी आणि हुबळी येथील स्फोटांचे काही कनेकशन आहे काय, याची चौकशी कोल्हापूर पोलीस करणार आहेत. त्यासाठी एक विशेष पथकच सोमवारी रात्रीच हुबळीला रवाना केले. या दोन्ही स्फोटाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात ‘हाय अर्लट’ राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. 

कर्नाटक हुबळी रेल्वे स्टेशनवर झालेल्या स्फोटाचे कोल्हापूर कनेकशन असलेची शक्यता कर्नाटक पोलीसांनी वर्तविली आहे. त्या दृष्टीने तपास करण्यासाठी विशेष पथक हुबळीला रवाना केले आहे. कर्नाटक पोलिसांशी संपर्कात राहून माहिती घेत आहोत. जिल्ह्यात ‘हाय अर्लट’ राहण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर  

टॅग्स :Blastस्फोट