शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या एका मताने फैसला, ठाकरेंच्या उमेदवाराने भाजपाला दिली मात, येथे झाली रोमांचक लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:22 IST

Parbhani Municipal Corporation Election Result: परभणी महानरपालिकेमध्ये उद्धवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये अत्यंत रोमांचक सामना झाला आणि या सामन्यामध्ये उद्धवसेनेच्या उमेदवाराने अवघ्या एका मताने भाजपाच्या उमेदवाराला मात दिली.

नुकत्याच झालेल्या  राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी अगदी अटीतटीच्या लढती झाल्या. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अवघ्या काही मतांनी जय पराजयाचा फैसला झाला. त्यात परभणी महानरपालिकेमध्ये उद्धवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये अत्यंत रोमांचक सामना झाला आणि या सामन्यामध्ये उद्धवसेनेच्या उमेदवाराने अवघ्या एका मताने भाजपाच्या उमेदवाराला मात दिली.निवडणूक आली की आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे? असा विचार करून बरेच जण मतदान करणं टाळतात. मात्र या निकालामुळे अवघ्या एका मताची काय किंमत असते हे दिसून आले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार परभणी महानरपालिकेमधील प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागा क्रमांक अ साठी उद्धवसेनेचे उमेदवार डहाळे व्यंकट लक्ष्मणराव, भाजपाचे प्रसाद केशवराव नागरे आणि शिंदेसेनेचे मोहन शाळिग्राम सोनवणे यांच्यात लढत झाली. या लढतीत उद्धवसेनेच्या व्यंकट लक्ष्मणराव डहाळे यांना ४ हजार ३१२ मते मिळाली, तर भाजपाचे प्रसाद केशवराव नागरे यांना ४ हजार ३११ मते मिळाली, अशा प्रकारे उद्धवसेनेचे व्यंकट लक्ष्मणराव डहाळे केवळ एका मताने विजयी झाले. या लढतीमध्ये शिंदेसेनेचे मोहन शाळिग्राम सोनवणे यांना १३६५ मते मिळाली.

महानगपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून परभणी महानरपालिकेमधील प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागा क्रमांक अ वर झालेल्या या रोमांचक लढतीचं निकाल पत्रक व्हायरल होत आहे. तसेच एका मताचं काय महत्त्व असंत हे या निकालामधून दिसत आहे, अशी प्रतिक्रिया लोक त्यावर व्यक्त करत आहेत.दरम्यान, परभणी महानगपालिकेमध्ये उद्धवसेना २५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला १२ जागा मिळाल्या आहेत. भाजपालाही १२ जागांवर यश आलं असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ११  जागा मिळाल्या आहेत. अपक्ष आणि इतरांना ५ जागंवर यश मिळालं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : One Vote Victory: Thackeray's Candidate Defeats BJP in Thrilling Contest

Web Summary : In Parbhani, a Shiv Sena (UBT) candidate won by a single vote against BJP in a municipal election. This highlights the critical value of each vote. Shiv Sena (UBT) emerged as the largest party with 25 seats.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६