शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

परमबीर सिंह बेपत्ता; सीआयडीकडून शोध सुरू, नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 06:38 IST

परमबीर यांनी तत्कालीन देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊन खंडणीचे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे ३० एप्रिलपासून ते रजेवर चंदीगडला गेल्यानंतर अद्याप परतलेले नाहीत.

जमीर काझी -

मुंबई : काही महिन्यांपासून बेपत्ता असलेले वादग्रस्त आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता झाले आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाकडून (सीआयडी) त्यांचा शोध सुरू असून, एक पथक त्यांच्या मूळगावी चंदीगड येथे ठिय्या मारून आहे. (Parambir Singh missing; Search launched by CID, possibility of fleeing to London via Nepal)

परमबीर सिंह यांना न्या. चांदीवाल आयोगाने अजामीनपात्र वाॅरंट बजावले असून, हे देण्यासाठी पथक तिकडे गेले. मात्र, ते नमूद पत्त्यावर आढळले नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परमबीर यांनी तत्कालीन देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊन खंडणीचे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे ३० एप्रिलपासून ते रजेवर चंदीगडला गेल्यानंतर अद्याप परतलेले नाहीत. आधी आठ दिवसांची रजा घेतल्यानंतर त्यांनी सतत आजारी असल्याचे प्रमाणपत्र पाठवून ‘मेडिकल लिव्ह’ वाढविली. १५ दिवसांपासून त्यांनी त्याबाबत गृहविभागाशी पत्रव्यवहार केला नसल्याचे समजते.

दरम्यान लिहिलेल्या पत्राबाबत न्या. चांदीवाल आयोगाच्या सुनावणीला ते एकदाही हजर राहिलेले नाही. त्यामुळे आयोगाने त्यांना अजामीनपात्र वाॅरंट बजावले. सीआयडीने त्यासाठी आधी मरिन लाईन्सच्या निवासस्थानी संपर्क साधला. मात्र, ते घर पाच महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पथकाने चंदीगडच्या निवासस्थानी जाऊन शोधाशोध सुरू केली आहे. मात्र, तिकडेही ते सापडलेले नसून, त्यांच्याशी संबंधिताच्या ठिकाणी शोध घेतला जात आहे.

सुनावणीकडे लक्ष -चांदीवाल आयोगाची चौकशी रद्द करण्याची सिंह यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली. याची सुनावणी येत्या २२ सप्टेंबरला होत आहे.

दोन्ही मोबाईल पाच महिने स्वीच ऑफ? -परमबीर यांचे दोन्ही मोबाईल पाच महिन्यांपासून स्वीच ऑफ आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली असली, तरी त्यापूर्वीच ते परदेशात गेल्याची चर्चा आहे. ते नेपाळमार्गे लंडनला गेले असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याबाबत अधिकृत काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ठाणे पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी सिंह यांच्याविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसCourtन्यायालयNepalनेपाळEnglandइंग्लंड