शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

परमबीर सिंह अखेर मुंबईत  गुन्हे शाखेसमोर प्रकटले ! गोरेगाव खंडणी प्रकरणात सहभागाचा आरोप अमान्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 6:43 AM

गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि दाऊदचा कथित साथीदार रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

मुंबई : गेले सात महिने अज्ञातवासात गेलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे अखेर गुरुवारी मुंबईत प्रगटले. गोरेगाव येथील खंडणी प्रकरणात फरार घोषित करण्यात आलेल्या सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. एकेकाळी परमबीर हे ज्यांचे प्रमुख होते त्याच पोलीस दलातील कनिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन आपली साक्ष नोंदवण्याची नामुष्की आली.गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि दाऊदचा कथित साथीदार रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात गुन्हे शाखेने विशेष एनआयए न्यायालयाकडून परवानगी घेत तळोजा कारागृहातून वाझे याचा ताबा घेत अटक केली होती.  गोरेगाव येथील दाखल खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केले. त्यांच्या जुहू येथील फ्लॅटबाहेर फरारची नोटीसही चिकटवली होती. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेत परमबीर यांच्या वकिलांनी ते फरार नसून, देशातच असल्याचा दावा करत ते लवकरच मुंबईत परतणार असल्याची माहिती दिली होती. त्यांनी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचे  सांगत केंद्रीय यंत्रणांनी चौकशी करावी, अशी विनंती केली आहे. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश दिल्याने पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजेच ६ डिसेंबरपर्यंत त्यांना अटकेचे संरक्षण मिळाले आहे. परमबीर यांनी आरोप फेटाळले गुन्हे शाखेने अग्रवालने सादर केलेल्या पुराव्यावरून परमबीर यांना प्रश्न विचारले. यादरम्यान सचिन वाझेसोबत झालेल्या संभाषणाबरोबर विविध ऑडिओ, व्हिडिओ क्लिप त्यांना दाखवण्यात आल्या. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून, आपण वाझेलाही कुणाकडून पैसे घेण्यास सांगितले नाही. वाझेला अन्य कोणी सांगितले असल्यास त्यांच्याकडे चौकशी करावी, असेही परमबीर यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले. चांदीवाल आयोगाने दिली तंबीपरमबीर सिंग यांच्याविरुद्धचा वॉरंट आम्ही अजूनही रद्द केलेले नाही, याची जाणीव ठेवा आणि त्यांना आयोगासमोर हजर राहायला सांगा, या शब्दांत न्या. कैलास चांदीवाल यांनी परमबीर सिंह यांच्या वकिलाची कानउघाडणी केली. तसेच आयोगासमोर परमबीर सिंग हजर झाले नाहीत, तर आम्हाला पोलीस यंत्रणेचा आधार घ्यावा लागेल, असेही बजावले.

परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाइल लपवला- परमबीर सिंह यांनी २६/११ मधील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाइल लपवल्याचा खळबळजनक आरोप निवृत्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) समशेर पठाण यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, तसेच परमबीर यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचेही आरोपात नमूद केले आहे. - २००८ मध्ये झालेल्या २६/११ नंतर यातील दहशतवादी अजमल कसाबला डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गिरगाव चौपाटी परिसरात अटक करण्यात आली. याबाबत माळी यांच्याशी बोलताना कसाबला पकडले तेव्हा त्याच्याकडून मोबाइल जप्त करत तो कांबळे हवालदाराकडे देण्यात आला. यादरम्यान तत्कालीन एटीएसप्रमुख परमबीर सिंह यांना त्या मोबाइलबाबत समजताच त्यांनी कांबळेंकडून तो ताब्यात घेतला. हा मोबाइल या प्रकरणातला महत्त्वाचा दुवा आहे.  

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस