शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफुटीस शिक्षक जबाबदार

By admin | Updated: March 11, 2015 01:41 IST

शहरातील न्यू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांनीच दहावीच्या बीजगणिताचा पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला.

कन्नड (जि. औरंगाबाद) : शहरातील न्यू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांनीच दहावीच्या बीजगणिताचा पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संतोष दादासाहेब गायके, राजेंद्र चिंधा वाणी, अरुण भिकनराव सोनवणे आणि सचिन शिवाजी भामरे या शिक्षकांना अटक केली आहे. एस. पी. दाभाडे हा शिक्षक फरार आहे. न्यू हायस्कूल या परीक्षा केंद्रावर दोनशे विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मंगळवारी ११ वाजता बीजगणिताचा पेपर होता. केंद्रप्रमुख डी. सी. मिस्तरी यांनी कस्टोडियनकडून प्रश्नपत्रिकांचे लिफाफे आणले व सहकेंद्रसंचालक एस. एस. घायतडक यांच्याकडे सुपूर्द केले. या प्रश्नपत्रिकांची विभागणी करण्यासाठी घायतडक यांनी वरील शिक्षकांची मदत घेतली. त्याचवेळी या शिक्षकांनी पेपर फोडला. ही माहिती मिळताच सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी केंद्रात प्रवेश केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. संतोष गायके हे स्टोअर रूममध्ये गणिताची ‘ए’ भागाची प्रश्नपत्रिका हातात घेऊन प्रश्नांची उत्तरे सांगत होते, तर याच शाळेतील राजेंद्रवाणी, अरुण सोनवणे व सचिन भामरे हे कार्बन टाकून चार प्रतीत कॉप्या लिहीत होते. एस. पी. दाभाडे याने ‘ए’ संचातून प्रश्नपत्रिका फोडून या चौघांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरील चार शिक्षकांना अटक केली असून, दाभाडे फरार आहे. पोलिसांनी ही माहिती तहसीलदार महेश सुधळकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर यांना कळविली. इत्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती परीक्षा मंडळ औरंगाबाद यांना कळविली. घडलेल्या प्रकाराबाबतची फिर्याद देण्यास कुणीही पुढे येत नव्हते. फिर्याद देण्यास कुणीही तयार नसेल, तर सरकारच्या वतीने पोलीसच फिर्यादी होतील हे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रसंचालक डी. सी. मिस्तरी यांनी फिर्याद दिली.