शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

पॅन्ट्री, वायफाय आणि बरेच काही...

By admin | Updated: May 16, 2015 03:19 IST

अनेक कामानिमित्त मुंबई ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाकडून लवकरच आलिशान असा प्रवास घडविला जाणार आहे.

मुंबई : अनेक कामानिमित्त मुंबई ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाकडून लवकरच आलिशान असा प्रवास घडविला जाणार आहे. एसटीच्या ताफ्यात दीड कोटी किमतीच्या दोन बसेस दाखल होणार असून, या बसेस मुंबई एअरपोर्ट ते पुणे मार्गावर चालविण्याचा निर्णय झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बसमध्ये प्रवाशांना प्रवासातच चहा-नाश्त्याची सोय करून देण्यासाठी पॅन्ट्री असणार आहे. तसेच वायफाय आणि अन्य सोयी-सुविधाही बसमध्ये उपलब्ध केल्या जाणार असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले. एसटी महामंडळाने सध्या आपल्या ताफ्यातील ११0 एसी बसपैकी ७0 बस नादुरुस्ती आणि सातत्याने होणारे बिघाड यामुळे त्या बाजूला काढण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी ३५ स्वत:च्या मालकीच्या आणि ३५ भाड्यावर एसी बस घेतल्या जाणार होत्या. मात्र हा प्रस्ताव बाजूला ठेवत ७0 बसेस स्वत:च्या मालकीच्या घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ३५ व्होल्वो आणि ३५ स्कॅनिया कंपनीच्या बस विकत घेतल्या. यातील १० बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, १५ बस महिनाभरात येतील. तर उर्वरित बस येत्या तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या ताफ्यात तब्बल दीड कोटी किमतीच्या दोन स्कॅनिया कंपनीच्या बस असून, त्या मुंबई एअरपोर्ट ते पुणे या मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने या मार्गावरून खासगी टॅक्सी आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एक सर्व्हे केला. या मार्गावरून खासगी टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता यातील तब्बल ६0 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी एसटीकडे खेचण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. त्यासाठी दीड कोटीच्या बस चालविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. खासगी टॅक्सीचे भाडे हे जवळपास १000 ते १२00पेक्षा अधिक असते. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भाडे जवळपास एक हजार रुपये ठेवण्याचा विचार करीत असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजख खंदारे यांनी सांगितले. या बसमध्ये प्रवाशांना चहा, कॉफी, नाश्ता, पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एक पॅन्ट्रीही उपलब्ध केली जाणार आहे. ही सेवा पहिल्यांदाच देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक आसनाच्या मागे एक टीव्हीदेखील बसविण्यात येणार असून, वायफायसारखी सुविधाही उपलब्ध केली जाणार असल्याचे खंदारे म्हणाले.