शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा याच राजकीय वारसदार

By admin | Updated: June 17, 2014 03:47 IST

पंकजा यांच्या साक्षीने भगवानगडाचे महंत ह.भ.प. नामदेव शास्त्री यांनी पंकजा ह्याच गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार आहेत, हे स्पष्ट केले

बीड/परळी : गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे आणि त्यांचे पुतणे आमदार धनंजय मुंडे हे दोघे एकत्र येणार की नाही, या चर्चेला आज परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या गोडजेवणाच्या कार्यक्रमात पूर्णविराम मिळाला. पंकजा यांच्या साक्षीने भगवानगडाचे महंत ह.भ.प. नामदेव शास्त्री यांनी पंकजा ह्याच गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार आहेत, हे स्पष्ट केले. त्यांनी पंकजा आणि धनंजय एकत्र होण्याचा प्रश्नच नाही, असेही सांगून टाकले. मुंडे यांच्या हयातीतच कुटुंबाचे विभाजन झाले होते, आता त्यांच्यानंतर त्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे या दोघांच्या एकत्रीकरणासंदर्भातील चर्चा हवेतच विरली आहे. मुंडे यांच्या निधनानंतर भाजपात निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. आपसूकच त्यांच्या कन्या पंकजा यांच्या नावाभोवती चर्चेला पूर्णविराम मिळत होता. परंतु पंकजा नेतृत्व स्वीकारणार की नाही, अशी साशंकताही व्यक्त केली जात होती. याच दरम्यान बीड जिल्ह्यातील काही जणांनी पंकजा आणि धनंजय या दोघांनी मिळून नेतृत्व स्वीकारावे, अशी मागणी केली होती. मात्र यासंदर्भात आमदार धनंजय आणि आमदार पंकजा यांच्याकडून काहीही सांगण्यात येत नव्हते. आजच्या या कार्यक्रमाने बीड जिल्ह्याच्या राजकारणाची पुढील दिशाही स्पष्ट केली आहे. पालवे आणि मुंडे असे दोन गट राजकारणात सक्रिय राहण्याचेच संकेत मिळाले आहेत. (प्रतिनिधी)