शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंना धक्का; आणखी एक भाऊ लागला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 08:32 IST

१२ वर्षांपूर्वी रमेश कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला होता.

मुंबई: राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना गळाला लावले आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील होते. त्यामुळे पंकजा कराड यांना आपल्या भावासारखं मानायच्या. तब्बल 11 वर्षे ते पंकजांसोबत होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याने पंकजा यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या सगळ्यात धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे बोलले जाते. 

LMOTY 2018: नात्याचे बंध...धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंची गळाभेट, 'लोकमत'च्या मंचावर अद्भुत योगरमेश कराड उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार आहे. डॉ. वि. दा कराड यांचे पुतणे रमेश कराड यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच सुरु झाली होती. मात्र, १२ वर्षांपूर्वी रमेश कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला होता. उस्मानाबाद लातूर बीडचे विधानपरिषदेचे आमदार दिलीप देशमुख यांचा कार्यकाळ संपतो आहे. ही जागा तीन टर्म देशमुख यांनी अबाधित ठेवली होती. मात्र, आता नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी त्यांनी ही जागा सोडली. रमेश कराड हे याच जागेसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज भरणार आहेत. रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक कराड नाणेफेकीत हरले. विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी दिली जावी या मताशी पंकजा मुंडे सहमत नव्हत्या अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.पंकजा मुंडे यांचा अपवाद वगळता रमेश कराड यांचे भाजपातील कोणाशीही सलोख्याचे नाते नाही. त्याचमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांचे मन वळवले आहे अशी चर्चा बीडमध्ये रंगली आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात बंड पुकारत राष्ट्रवादीची वाट धरली. त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नात्यातही वितुष्ट आले होते. त्यांच्य़ा नात्यातील हा तणाव अजूनही कायम आहे. मुंडे घराण्यात फूट पाडल्याच्या मुद्द्यावरून पंकजा यांचे कार्यकर्ते अनेकदा शरद पवारांवर तोंडसुखही घेताना दिसतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर रमेश कराड यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश पंकजा यांच्यासमोरची बिकट आव्हाने निर्माण करणारा असल्याची चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस