LMOTY 2018: नात्याचे बंध...धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंची गळाभेट, 'लोकमत'च्या मंचावर अद्भुत योग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 01:31 AM2018-04-11T01:31:26+5:302018-04-11T02:09:57+5:30

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018'च्या मंचावर आज एक अभूतपूर्व असा योग पाहायला मिळाला. जवळपास 6 वर्षांपासून राजकारणात एकमेकांचे शत्रू म्हणून वावरत असलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावाबहिणींनी लोकमतच्या व्यासपीठावर सगळे मतभेद विसरून उपस्थितांसमोर गळाभेट घेतली.

Relations... Dhananjay Munde hugs Pankaja Munde on the stage of Lokmat Maharashtrian of the year awards 2018 | LMOTY 2018: नात्याचे बंध...धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंची गळाभेट, 'लोकमत'च्या मंचावर अद्भुत योग

LMOTY 2018: नात्याचे बंध...धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंची गळाभेट, 'लोकमत'च्या मंचावर अद्भुत योग

googlenewsNext

मुंबई-  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018'च्या मंचावर आज एक अभूतपूर्व असा योग पाहायला मिळाला. जवळपास 6 वर्षांपासून राजकारणात एकमेकांचे शत्रू म्हणून वावरत असलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावाबहिणींनी लोकमतच्या व्यासपीठावर सगळे मतभेद विसरून उपस्थितांसमोर गळाभेट घेतली. त्यांच्या गळाभेटीमुळे उपस्थित पाहुण्यांच्याही भुवया उंचावल्या.

या दुरावलेल्या दोघा भावाबहिणींच्या भेटीनं राजकारणातली उत्कृष्ट परंपरा पुन्हा एकदा समोर आली. राजकारणात कोणीही कधीही कोणाचं कायमचं शत्रू नसतं याचं उत्तम उदाहरण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या गळाभेटीनं उभ्या महाराष्ट्राला दिलं आहे. पंकजा मुंडे सत्तेत मंत्रिपदी आहेत, तर धनंजय मुंडे हे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत.

दोघांकडेही राजकारणातली संवैधानिक पदे आहेत. सभागृहात दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना बऱ्याचदा पाहायला मिळतात. परंतु हेच राजकारणातले एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या दोन नेत्यांनी गळाभेट घेतल्यानं रक्ताचं नातं कधीही विसरता येत नसल्याची प्रचिती आली. आपल्या आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी विरोधकांना जेरीस आणणाऱ्या धनंजय मुंडे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' या पुरस्काराने गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनंजय मुंडे यांना 'पॉवरफुल्ल' राजकारण्यासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या, राज्याचं नाव देशातच नव्हे तर जगात मोठं करणाऱ्या, समाजासाठी सर्वस्व वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा लोकमत समूहाच्या वतीने 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. या पुरस्कारांचं हे पाचवं वर्ष होतं. महालक्ष्मी येथील एनएससीआय डोममधील दिमाखदार सोहळ्यात विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं. 

Web Title: Relations... Dhananjay Munde hugs Pankaja Munde on the stage of Lokmat Maharashtrian of the year awards 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.