शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

एक विधान अन् चर्चेला उधाण; पंकजा मुंडेंचा ‘नवा पक्ष’ अन् छगन भुजबळ, संजय राऊतांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 05:45 IST

मंत्री झाले काय, नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. बीड माझेच आहे. मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, कारण परळी राष्ट्रवादीकडे गेल्याने आष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मुंबई - ‘आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील, असे विधान राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धनमंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. त्यानंतर तर्कवितर्क सुरू असतानाच स्वत: पंकजा यांनी त्याबाबतचा खुलासा केला आहे.

यावर माजी मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींचा पक्ष त्या स्थापन करत असतील तर विचार करायला हरकत नाही. उद्धवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारेचा पक्ष स्थापन करावा असे पंकजा यांना वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

‘मी गुंडाला गुंड, बंडाला बंड आहे; कोणाला घाबरत नाही...’मी गुंडाला गुंड आहे आणि बंडाला बंड आहे. राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मात काम करणाऱ्या माणसाने राजकारणात हस्तक्षेप करू नये, अशी टीका मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी येथे केली. एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर खूप जणांचे प्रेम वाढले. मंत्री झाले काय, नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. बीड माझेच आहे. मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, कारण परळी राष्ट्रवादीकडे गेल्याने आष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे.

कोणत्या संदर्भाने केले होते विधान?पंकजा मुंडे यांनी रविवारच्या विधानाचा सोमवारी खुलासा केला. त्या म्हणाल्या की, ‘नाशिकमध्ये एक गिरासे म्हणून डॉक्टर आहेत. त्यांनी माझ्याआधी भाषण केले. तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप प्रेम करायचो. त्यांना अनेकदा भेटायचो. तेव्हा ते म्हणाले, ताई तुम्हाला माहिती आहे का की गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक एवढे आहेत ते मोजायला गेले तर एक पक्ष निर्माण होईल. त्यांच्या विधानाला उत्तर देताना मी म्हणाले की, हो पक्ष निर्माण झालाच आहे. आता या पक्षाशी (भाजप) देखील त्यांच्यावर (गोपीनाथ मुंडे) प्रेम करणारे लोक जोडले गेलेलेच आहेत. त्याचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो अर्थ तसा निघणार नाही.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेChhagan Bhujbalछगन भुजबळSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा