मुंबई: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या चौकीदार चोर है या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सोशल मीडियावरुन उत्तर दिलं. मोदींनी त्यांच्या ट्विटरवरील नावापुढे चौकीदार शब्द लावला. त्यानंतर भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी, खासदारांनी, नेत्यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला. मोदींच्या समर्थकांनीदेखील त्यांच्या नावापुढे हा शब्द जोडत त्यांना समर्थन दिलं. यानंतर ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. पंतप्रधान मोदींनी नावापुढे चौकीदार लावल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी लगेच ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला. यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेकांनी याचं अनुकरण केलं. राज्याच्या पातळीवरही हाच ट्रेंड दिसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला. भाजपाच्या इतर मंत्र्यांनीही हे कॅम्पेन फॉलो केलं. मात्र ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला नाही.
पंकजा मुंडे नाहीत 'चौकीदार'; ट्विटरवर जुनंच नाव कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 16:14 IST