शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:10 IST

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 Schedule: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी (जि. पुणे) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. रात्री आठनंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. साधारण रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास पालखी मंदिराच्या मुख्य महाद्वारातून प्रदक्षिणासाठी बाहेर पडेल.

आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण आळंदीनगरी भक्तिमय झाली आहे. माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. सुमारे तीन ते चार लाखांहून अधिक भाविक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. 

आळंदीत हरिनामासह ‘ज्ञानोबा तुकारामांचा’ अखंड जयघोष सुरू आहे. येथील इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर,  ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांची सुरक्षा लक्षात घेता पोलिस प्रशासनाने संपूर्ण शहरात एक हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कोणत्या दिवशी कुठे पोहोचणार?१९ जून-  आळंदीतून प्रस्थान२० व २१ जून- पुणे२२ जून व २३ जून- सासवड२४ जून- जेजुरी२५ जून- वाल्हे२६ जून- लोणंद२७ जून- तरडगाव२८ जून- फलटण२९ जून- बरड३० जून- नातेपुते१ जुलै- माळशिरस२ जुलै- वेळापूर३ जुलै- भंडीशेगाव४ जुलै- वाखरी५ जुलै- पंढरपूर

पहिला मुक्काम आजोळघरातगुरुवारची नित्यनियमाची माऊलींची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी प्रस्थान होईल. टाळ-मृदुंगाच्या निनादात मंदिर व शहर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर आजोळघरात फुलांनी सजविलेल्या आसनावर माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम होईल.

पालखी सोहळ्यातील प्रमुख टप्पे - नीरा येथे नीरा नदीत पादुका स्नान - चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण - पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण- खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण- ठाकरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण - बाजीरावची विहीर येथे चौथे गोल आणि दुसरे उभे रिंगण - वाखरी येथे तिसरे उभे रिंगण

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरAlandiआळंदी