शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

LIVE: 'नियम मोडण्यासाठी आलोय' म्हणत प्रकाश आंबेडकरांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 15:10 IST

Pandharpur Protest: प्रकाश आंबेडकर विठ्ठल मंदिराजवळ; परिसरात मोठी गर्दी

पंढरपूर: राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विठ्ठलाच्या दर्शनावर आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अखेर प्रशासनानं त्यांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली. आंबेडकर यांच्यासोबत काही मोजक्या जणांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असं आंबेडकर म्हणाले. राज्यातील प्रार्थनास्थळं लवकरच उघडली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिल्याचं त्यांनी सांगितलं.राज्य सरकारनं माझ्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. राज्यातील प्रार्थनास्थळं सुरू करण्यासाठी सरकारनं १० दिवसांची मुदत मागितली आहे. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. १० दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपूरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांशी बोलताना आपण त्यांना काळाराम मंदिराची आठवण करून दिल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. देश पारतंत्र्यात असताना बाबासाहेब आंबेडकर यांना नाशिकमधील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला होता. त्यावेळी मंदिराची किल्ली पुजाऱ्याच्या हाती होती. आता मंदिराची किल्ली तुमच्या हाती आहे, असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आवाहनाला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कोणी कोणी घेतलं विठ्ठलाचं दर्शन?अरुण महाराज बुरघाटे, गणेश महाराज शेटे, धनंजय वंजारी, आशोक सोनोने, रेखा ठाकूर, तुकाराम महाराज भोसले, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, विकी शेंडगे, अमित भुईगळ

Live Updates:- संजय राऊत सत्तेत आहेत. ते कशावर बसलेत हे त्यांनी आधी लक्षात घ्यावं. सरकारला भान राहिलेलं नाही. नाही तर आम्हाला आंदोलन करण्याची गरज भासली नसती- प्रकाश आंबेडकर - कायदा न पाळण्याची भूमिका विरोधकांनी किमान आरोग्यविषयक प्रश्नावर तरी घेऊ नये- शिवसेना खासदार संजय राऊत- प्रकाश आंबेडकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा नाहीच; आंबेडकरांनी दीड तास वाट बघितली; प्रकाश आंबेडकर शासकीय विश्रामगृहावरुन आंदोलनस्थळाकडे रवाना- प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी - प्रकाश आंबेडकर करत असलेलं स्वागतार्ह; मंदिरं उघडली जावीत ही भाजपाचीही भूमिका- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर- सरकारनं मातोश्रीच्या बाहेर पडावं; सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात कमी पडलं- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर- लोक एकत्र आले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत नाही, हेच आम्हाला दाखवायचंय- प्रकाश आंबेडकर- विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यावर ठाम; मी जिल्हाधिकाऱ्यांची वाट पाहतोय- प्रकाश आंबेडकर

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPandharpurपंढरपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या