शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
3
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
4
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
5
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
6
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
7
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
8
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
9
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
10
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
11
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
12
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
13
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
14
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
15
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
16
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
17
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
18
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
19
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
20
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर

सहा लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण, २९ जिल्ह्यांतील ४१ लाख हेक्टरचे पंचमाने प्रलंबितच; अहवालास दहा दिवसांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:17 IST

त्यानंतरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.

पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे केवळ सप्टेंबरमध्ये तब्बल ४७ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५ जिल्ह्यांमधील सुमारे ६ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित ४१ लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्यासाठी दिवाळीच उजाडणार आहे. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुन्हा शासन निर्णय जारी होईल. त्यानंतरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.

राज्यात खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या  काळात एकूण २५ लाख ६८ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली होती, तर केवळ सप्टेंबर महिन्यात तब्बल ४७ लाख ३ हजार ७८१ हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. त्यामुळे एकूण बाधित क्षेत्र ७२ लाख ७१ हजार ७८१ हेक्टर इतके झाले आहे. त्यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळातील नुकसानीसाठी यापूर्वीच २ हजार ५४२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून त्याचे वाटप सुरू आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल ३४ जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. अजूनही २९ जिल्ह्यांमधील अहवाल मिळालेले नाहीत.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या म्हणण्यानुसार, काही जिल्ह्यांत शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून होते. त्यामुळे पंचनामे पूर्ण होण्यास १० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. साहजिकच अहवाल प्राप्त होण्यासही उशीर होऊ शकतो. हा अहवाल आल्यानंतर महसूल विभागाकडून याचा पुन्हा शासन निर्णय जारी केला जाईल. यात प्रत्यक्ष नुकसान झालेल्या क्षेत्र व मदत याचा उल्लेख केला जाणार आहे. त्यानंतरच मदत  जमा केली जाणार आहे. 

जिल्हानिहाय पंचनाम्यानुसार नुकसान क्षेत्र --जिल्हा     क्षेत्र (हे.)     शेतकरी     नुकसान  सातारा     ४२०४    ११०४५    ६.२५ कोटीकोल्हापूर     १६९७    ५८६०    २.७६ कोटीहिंगोली     ५५३७३    १०५१२०    ६४.६२ कोटीबुलढाणा     ३३३६९४    ४०४९०८    २८९.२७ कोटीवर्धा     १६७४७७    १४९५४६    १४२.४० कोटीएकूण     ५९८३४६    ७१११९८    ५४२.६५ कोटी

सप्टेंबरमधील पंचनामे अद्याप अपूर्णसातारा, कोल्हापूर, हिंगोली, बुलढाणा आणि वर्धा या   जिल्ह्यांचेच अहवाल कृषी विभागाकडे प्राप्त झाले. त्यानुसार ५ लाख ९८ हजार ३४६ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. याचा फटका ७ लाख ११ हजार १९८ शेतकऱ्यांना बसला असून   जाहीर केलेल्या मदतीनुसार  शेतकऱ्यांना ५४२ कोटी ६५ लाखांची मदत मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Damage Assessment Incomplete; Farmers Await Relief Funds Post-Diwali

Web Summary : Heavy rains damaged crops on 47 lakh hectares. Assessments are complete on only 6 lakh hectares. Farmers await government aid after Diwali, with ₹2,542 crore already allocated for earlier losses.
टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस