शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
3
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
4
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
5
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
6
Eknath Shinde: ‘बाळासाहेब हे एकच ब्रँड; स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा बँड वाजवणार' एकनाथ शिंदेंचा टोला
7
रणवीर सिंहचा 'धुरंधर' सिनेमा दोन भागात येणार? तगड्या क्लायमॅक्ससह मेकर्सचा नवीन प्लॅन
8
आंध्र प्रदेशातील आमदाराला केलं ३ दिवस 'डिजिटल अरेस्ट', १.०७ कोटींचा गंडा, ८ जणांना अटक
9
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
10
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
11
CNG Crisis: ‘सीएनजी’ची बोंब, हजारो वाहने रस्त्यावरून गायब, प्रवाशांचे प्रचंड हाल!
12
मदीना बस अपघातात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू; नातेवाईक म्हणाले- अल्लाहने त्यांच्या नशिबात...
13
सौदीचे प्रिन्स दौऱ्यावर येण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; दिलं मोठं 'गिफ्ट'
14
Navi Mumbai: महाराजांचा अपमान सहन करणार नाही, दडपशाही जुमानणार नाही; अमित, आदित्य यांचा सरकारला इशारा
15
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
16
IND vs SA : ...तर करुण नायरसह तिघांपैकी एकाला मिळू शकते टीम इंडियात ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’
17
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
18
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
20
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
Daily Top 2Weekly Top 5

Kashinath Chaudhary: काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला अखेर 'ब्रेक', दबाव वाढल्याने भाजपचा 'यू टर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 09:39 IST

डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काशिनाथ चौधरी हे प्रमुख आरोपी असल्याचे आरोप भाजपने केले होते. त्याच काशिनाथ चौधरी यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतल्याने भाजपविरोधात देशभर राळ उठली होती.

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर: डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काशिनाथ चौधरी हे प्रमुख आरोपी असल्याचे आरोप भाजपने केले होते. त्याच काशिनाथ चौधरी यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतल्याने भाजपविरोधात देशभर राळ उठली होती. मात्र, भाजपवर दबाव वाढल्याने अखेर सोमवारी भाजपने याबाबत यू टर्न घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष राजपूत यांना पत्र पाठवून या घटनेची संवेदनशीलता पाहता, काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला तत्काळ स्थगिती देत असल्याचे जाहीर केले.

डहाणू विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला काशिनाथ चौधरींचा प्रभाव असलेल्या भागातून मोठा फटका बसल्याचे दिसून आले होते. तसेच डहाणू नगर पालिका आणि पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना या भागात संभाव्य फटका बसण्याची शक्यता पाहता, भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी काशिनाथ चौधरी यांचा रविवारी डहाणू येथील कार्यक्रमात पक्षप्रवेश करून घेतला. 

महाविकास आघाडीतून मोठा मासा गळाला लावण्यात यश मिळवले, असे समर्थक जाहीरपणे सांगू लागले होते. तथापि, प्रसारमाध्यमांवर या प्रवेशाबाबतचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर भाजपच्या भूमिकेविरोधात खुद्द भाजपमधील काहींनी व विविध संघटनांमधून मोठा विरोध होऊ लागला. प्रसारमाध्यमांवर साधू हत्याकांडाबाबत सुरू झालेली चर्चा लक्षात घेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघरचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र पाठवून चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला तत्काळ स्थगिती दिली. 

­काय आहे प्रकरण?

डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल २०२० रोजी रस्ता चुकल्याने गडचिंचले भागात प्रवेश केलेल्या कल्पवृक्ष गिरी ऊर्फ चिकणे महाराज (७०), सुशील गिरी महाराज (३५) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगंडे (३०) यांना मुले पळवणारी टोळी व चोर असल्याचा गैरसमज स्थानिकांनी करून घेतला. वन विभागाच्या चौकीत लपलेल्या दोन साधूंची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या झाल्याचे पडसाद देशभरात उमटले होते. या निर्घृण हत्येमागे पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ चौधरी हे प्रमुख आरोपी असल्याने सीबीआयच्या चार्जशीटमध्ये त्यांना प्रमुख आरोपी करावे, अशी मागणी भाजपचे संतोष जनाठे यांनी लावून धरली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Kashinath Chaudhary's entry into BJP halted after backlash.

Web Summary : BJP U-turns on Kashinath Chaudhary's entry after outrage over his alleged involvement in the Gadchinchale lynching case. Pressure from within the party and various organizations led to the decision to suspend his membership.
टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा