एनडीए परिसरात आढळली पाकिस्तानी चलनातील नोट; सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 07:47 IST2025-02-10T07:47:18+5:302025-02-10T07:47:42+5:30
यादव यांनी ती पाकिस्तानी नोट पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी संबंधित सोसायटीत पाहणी केली. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकाॅर्डिंग होत नसल्याने फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही.

एनडीए परिसरात आढळली पाकिस्तानी चलनातील नोट; सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार उघड
पिंपरी (जि. पुणे) : मुळशी तालुक्यातील भुकूम येथे पाकिस्तानी चलनातील नोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्काय आय मानस लेकसिटीमधील आयरिस-३ हाउसिंग सोसायटीत शनिवारी हा प्रकार समोर आला. ही सोसायटी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या (एनडीए) हद्दीपासून काही मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.
हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी याबाबत बावधन पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे. यादव हे त्यांच्या सोसायटीतील इतर दोघांसोबत शनिवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान लिफ्टमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना लिफ्टजवळ एक चलनी नोट दिसून आली. त्या नोटवर ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ असे नमूद होते. यादव यांनी ती पाकिस्तानी नोट पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी संबंधित सोसायटीत पाहणी केली. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकाॅर्डिंग होत नसल्याने फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही.