शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पागोटे-चौक ग्रीन कॉरिडॉर बांधणार; मुंबई-बंगळुरु प्रवास सहा तासांत, कोंडी फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 07:58 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, ४८ आणि ३४८ या तीन महामार्गांसह तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, मुंबई-गोवा आणि गोवा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालाही जोडणार आहे.

मधुकर ठाकूरउरण - सुमारे ३५०० कोटी रुपये खर्चून मुंबई-गोवा आणि मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा २९ किमीचा जेएनपीए-पागोटे-चिरनेर ते चौक दरम्यान सहापदरी ग्रीन कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षांत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच मुंबई-बंगळुरु प्रवास सहा तासांवर येईल, असा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी केला. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, ४८ आणि ३४८ या तीन महामार्गांसह तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, मुंबई-गोवा आणि गोवा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालाही जोडणार आहे. यामुळे मुंबई-बंगळुरू प्रवास सहा तासांत करणे सहज शक्य होईल, असा अंदाज प्राधिकरणाने वर्तविला आहे. उरण-पागोटे ते चौक दरम्यानच्या या मार्गाची लांबी २९.२१९ किमी आहे. या रस्त्यावर चिरनेर आणि आपट्यादरम्यान दोन बोगदेही उभारण्यात येणार आहेत. यात चिरनेर बोगदा १.९ किमीचा, तर आपटा बोगदा १.७ किमीचा आहे. या ट्वीन टनेलची लांबी ३.४७ किमी आहे. या मार्गावर सहा मोठ्या आणि पाच लहान पुलांसह  सर्व्हिस रोड, स्लिप रोडचा समावेश आहे.

पागोटे-चौक या प्रस्तावित ग्रीन कॉरिडॉरसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. लवकरच प्रकल्पाच्या कामासाठी निविदा मागविणार येणार आहेत. कार्यादेश दिल्यापासून ३० महिन्यांत हे काम पूर्ण करावे लागणार आहे. या रस्त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. - यशवंत घोटकर, उपसंचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेgoaगोवा