स्थानिक नगरपरिषदेच्या चमुने गुरूवारी शहरातील बजाज चौक व रामनगर भागातील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. ...
रात्रीच्या सुमारास मुख्य मार्गावरील कुलूपबंद कृषी केंद्राला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने त्या व्यावसायिक प्रतिष्ठानातून ३८ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. ...
५३ डॉक्टारांच्या अतिरिक्त डिग्रीची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आढळून आले आहे. चौकशी सुरू आहे. डिग्री बोगस असेल तर संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल. २० डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी गुरु ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १० हजार रुपये उधार देण्यास नकार दिल्यामुळे तीन आरोपींनी एका तरुणाला मारहाण करून १८ हजार रुपये तसेच दोन मोबाईल हिसकावून नेले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर, सावता लॉनजवळ ८ जुलैच्या रात्री ही घटना घडली.अनुप ह ...
अर्जुनी-मोरगावचा ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. वैद्यकीय अधीक्षक आहेत की नाही, याचा कार्यरत कर्मचाऱ्यांना नेमका अंदाज नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांची उणिव ही नित्याचीच बाब झाली आहे. ...
सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट व्हावी, सरकारी रुग्णालयातील औषधांचा तुटवडा तातडीने दूर करावा, खासगी हॉस्पिटलवर नियंत्रणासाठी व खासगी आरोग्यसेवेचे प्रमाणीकरणासाठी रुग्णकेंद्री वैद्यकीय आस्थापना कायदा पारित करावा, या मागणीसाठी जन आरोग्य अभियानाच्या बॅनरखाली ...
मागील दोन तीन महिन्यांपासून पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने बँकामधून कर्जाची उचल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ५७० रुपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. ...
विना परवाना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शहरातील १२ वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी (दि.१२) जप्तीची कारवाई केली. यामुळे खासगी वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे. ...
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) वॉर्डात पाणी साचल्यानंतर या रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाची पोलखोल केली जात आहे. ...
रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. ...