लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिंपळगाव बसवंतला झालेल्या सभेपूर्वीही डोंगरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तर शरद पवार यांच्या सभेत त्यांनी अर्धनग्न अवस्थेतच व्यासपीठावर जात निवेदन दिले होते. ...
माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर जाऊ नका, मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजप-शिवसेना आमदारांच्या बैठकीत दिल्या. ...
काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली तेव्हा सत्ताधारी बाकावर बसलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आणि सभागृहाने या अनोख्या भेटीचे बाके वाजवून स्वागत केले. ...
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राणा यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. ...
दोन वर्षांच्या चिमुकलीसह शुक्रवारी (गांधीसागर ) तलावात उडी घेऊन एका मातेने आत्महत्या केली. आज सोमवारी सकाळी मायलेकीचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत महिलेची अद्याप ओळख पटली नाही. मात्र ती वर्धा येथील रहिवासी असावी, असा ...