MNS corporator kidnapped in shirdi | बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवकाचं अपहरण
बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवकाचं अपहरण

शिर्डी: मनसे नगरसेवकाचे काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केल्याचे वृत्त आहे. काल मध्यरात्री बाभळेश्वर जवळच्या एका हॉटेलसमोर जेवणासाठी थांबले असता एका कारमधून आलेल्या व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांना गाडीत घालून अपहरण केल्याचे वृत्त आहे.

अपहरणावेळी दत्तात्रय कोते यांच्यासोबत शिर्डीच्या एका नगरसेविकेचे पतीही होते, अशी माहिती समोर आली आहे. लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिली. मात्र याबाबत अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याचं सांगितलं. घटनेची सत्यता पडताळून आहोत अशी माहिती त्यांनी दिली. सध्या शिर्डी नगरपंचायत अध्यक्ष पदासाठी निवडणूक लागलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्व आहे. 


Web Title: MNS corporator kidnapped in shirdi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.