नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे पर्यटन स्थळ गजबजून गेले होते. पर्यटकांनी येथील आल्हाददायक वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला. ...
पर्यटन स्थळावर आलेल्या दर्यापूर येथील पर्यटकांच्या वाहनाला मालवीय पॉइंटवर रविवारी अपघात झाला. यात सात जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ...
वाघिणीने हल्ला करतात पशुपालकाने म्हशीच्या कळपात आश्रय घेतला. सर्व म्हशींनी एकत्र होऊन वाघिणीला दूरपर्यंत पिटाळले. परंतु वाघिणीने म्हशीच्या वगारूवर (बछडा) हल्ला करताच म्हशीने प्रतिहल्ला केला. या झुंजीत म्हैस ठार झाली, तर बछडे गंभीर जखमी झाले. ...
वैनगंगा नदीवरील ९० वर्षे जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशारावजा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे. ...
वनविकास महामंडळातील वनप्रकल्प विभाग भंडारा विभागीय कार्यालयाच्या परिसरात वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विभाग राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आ ...
गेल्या १० ते १२ वर्षांपासून भंडारा नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक प्रभागांमध्ये रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...
तालुक्यात खरीप हंगामाला जोमात प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीची कामे पुर्णत्वाकडे आहे. सध्या दमदार पावसामुळे चिखलणीच्या कामाला वेग आला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ३७ टक्के कमीच पाऊस पडला आहे. ...
ज्ञानाचे मूल्य कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मोठे आहे. भविष्यात शाळा-महाविद्यालयात निर्माण होणारी सभागृह ज्ञानाची मंदिरे व्हावीत. तसेच शैक्षणिक संस्थेने विद्यार्थी घडवत असताना त्यांच्यात देशभक्ती व राष्ट्रनिर्माणाची भावना निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिप ...
चिमूर तालुक्यातील वाहांगाव, खुरसापार येथील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून अंकुर कंपनीचे प्रभाकर वाण १८९-३६५६१ घेऊन पेरणी केली. मात्र कालावधी होऊनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे न ...
तुकुम विद्याविहार स्कूलजवळील नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या खोल टाकित पडलेल्या एका बैलाचे रेस्क्यू आॅपरेशन करून इको-प्रोच्या नगर संरक्षक दलाने नागरिकांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढले. ...