‘दुसकाय रे दुसकाय, विदर्भाचा दुसकाय, त्या दुसकायात इदर्भाचे येले सुरू, मुख्यमंत्री साहेब म्हणते हो समद बराबर करू, एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव’ या झडतीतून शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचीच बोलती बंद केली. ...
‘अमृत’ योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पातून पाणी आणले जात आहे. ३०२ कोटी रुपयांच्या या योजनेची गाथा सर्वदूर पोहोचली आहे. करारानुसार ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करून प्राधिकरणाला योजना हस्तांतरित करायची आहे. याला अवघे दोन महिने शिल्लक आहे. ...
या वाघीणीला बंदिस्त करून मेळघाट बाहेर सोडण्यात यावे अशी मागणी प्रकर्षाने समोर आली आहे. मेळघाटसाठी वाघ किंवा अन्य वन्य प्राण्यांचे हल्ले नवे नाहीत. मात्र दीड महिन्याच्या कालावधीत ई-१ वाघीणीने धुमाकुळ घातल्याने वनविभाग व आदीवासींमध्ये संघर्ष पेटू लागला ...
उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे. ...