भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल पसरले असून, या जंगलातून तेंदूपत्ता मिळतो. तेंदूपत्ताची मुबलकता लक्षात घेऊ न या दोन्ही जिल्ह्यात विडी उद्योग फोफावले. दोन्ही जिल्ह्यात गोंदिया, जबलपूर आणि कामठी येथील तीन नामांकित कंपन्याचे विडी कारखान ...
भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील ताज किराणा स्टोअर्समध्ये रिफाईन्ड सोयाबिन तेलाची विक्री करण्यात येत होती. यात १५ किलोचे एकूण ११ टीन विक्रीसाठी साठविण्यात आले होते. सदर खाद्य तेलाबाबत अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी. नंदनवार यांनी चौकशी केली असता ...
कैलास किसन देशमुख यांचे निलज येथे घर आहे. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यामुळे त्यांनी घरालगतच एका कौलारू घरात तात्पुरता आश्रय घेतला आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वयंपाकानंतर त्यांची ...
दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. ...
आकाशात अचानक ढग जमा होऊन पाऊस कोसळत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोंढा येथे दुपारी २ वाजता दरम्यान शनिवारला जोरदार पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे शेतात पावसाचे पाणी साचले. यामुळे कापणी सुरु असलेले धान पीक प्रभावित झाले. कडपा पाण्याखाली आल्याने शेतकऱ् ...
शहरात घरफोड्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रात्रच नव्हे, तर दिवसाही घरफोड्या झाल्या व होत आहेत, त्याही कडीकोंडा तोडून शहराबाहेरील वसाहतींत घरफोड्या अधिक प्रमाणात होत आहे. आता शहरातही दाट वस्तीत घरफोड्या झाल्या आहेत. कुठल्याही धातूचे कुलूप फोडून घरफ ...
लक्ष्मीपूजनच्या वेळेस कापसाची आणि सोयाबीनची मोठ्या श्रध्देने पूजा केली जाते. तसेच भरघोस उत्पन्नासाठी देवाला साकडेही घातले जातात. मात्र यावर्षी अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी कापूस न आल्याने कापसाशिवायच लक्ष्मीपूजन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे श ...
प्राप्त माहितीनुसार, सेवाग्राम येथील आदर्शनगर भागातील रहिवासी असलेला अविनाश गोंडगे व अविनाशची बहीण अनुष्का गोंडगे हे दोघे शेळ्या चारण्यासाठी आदर्शनगरच्या शेजारी असलेल्या अण्णासागर तलाव परिसरात गेले होते. शेळ्या चरण्यासाठी सोडल्यानंतर अनुष्का व अविनाश ...
या योजनेचे काम वर्धा जिल्ह्यात दोन टप्प्यात पूर्ण झाले असून राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करीत त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दहा वर्ष पूर्ण झालेल्या तीन मिटर रुंदीच्या रस्त्यांना यात ...
झडशी येथील शेतकरी राहूल कोठाळे यांनी त्यांच्या मालकीचा बैल शेतातील गोठ्यात बांधला होता. सोमवारी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना बैल मृत अवस्थेत दिसला. शिवाय घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता वाघाच्या पावलाचे ठसे त्यांना दिसून आले. ...