शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

‘पद्मावत’ विरोधाचे लोण महाराष्ट्रातही; ठिकठिकाणी तोडफोड, निदर्शने; पोलीस बंदोबस्तात आज प्रदर्शित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 04:05 IST

बहुचर्चित ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधातील देशभरातील आंदोलनाचे लोण महाराष्ट्रातही पोहोचले असून, बुधवारी अनेक ठिकाणी तोडफोड, निदर्शने झाली. करणी व राजपूत सेनेच्या आंदोलनामुळे गुरुवारी राज्यात पोलीस बंदोबस्तात हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. बुधवारी मुंबईतील १०० हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत अटक करण्यात आली.

मुंबई : बहुचर्चित ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधातील देशभरातील आंदोलनाचे लोण महाराष्ट्रातही पोहोचले असून, बुधवारी अनेक ठिकाणी तोडफोड, निदर्शने झाली. करणी व राजपूत सेनेच्या आंदोलनामुळे गुरुवारी राज्यात पोलीस बंदोबस्तात हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. बुधवारी मुंबईतील १०० हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत अटक करण्यात आली.मुंबईतील १४० स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या दीपिका पदुकोन, शाहिद कपूर, रणवीर सिंह व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवलीत बुधवारी थ्रीडी चित्रपटाचे खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणा-या ३५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यात मंगळवारी मध्यरात्री २५ जणांनी सातारा-मुंबई महामार्गावर वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली. त्यात १० वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी १५ जणांना अटक केली.मराठवाड्यात सर्व सिनेमागृहांना पोलिसांनी संरक्षण पुरविले. औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तर बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर येथे निदर्शने झाली. धुळे महामार्गावर रास्ता रोको झाला. नाशिकला गंगापूर धरणावरील जलसमाधी आंदोलन पोलिसांनी उधळले.मनसेने मारली पलटी-‘पद्मावत’ला पाठिंबा देतानाच गरज भासल्यास दिग्दर्शक, कलाकारांच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याचे सांगणाºया मनसेने २४ तासांत भूमिका बदलली. मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांचे वक्तव्य पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचा खुलासा पक्षाने केला.चार राज्यांच्या मल्टिप्लेक्स मालकांचा प्रदर्शनास नकार-देशभरातील ७५ टक्के मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचे प्रतिनिधित्व करणाºया ‘मल्टिप्लेक्स असोसिएसन आॅफ इंडिया’ या संघटनेने संभाव्य हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ हा चित्रपट न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.संघटनेचे अध्यक्ष दीपक अशर यांनी सांगितले की, या राज्यांमध्ये सुरू झालेला व होऊ शकणारा हिंसाचार पाहता, प्रक्षकांच्या सुरक्षेसाठीआमचे सदस्य हा चित्रपट त्यांच्या मल्टिप्लेक्समध्ये दाखविणार नाहीत.

टॅग्स :Padmavatपद्मावतPadmavatiपद्मावती