पद्म पुरस्कार २०२६: महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात! राज्यातील सर्व पुरस्कार विजेत्यांची यादी एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 20:26 IST2026-01-25T20:24:42+5:302026-01-25T20:26:17+5:30

Padma Awards 2026 winners from Maharashtra :

Padma Awards 2026 winners from Maharashtra : List of all award winners from the state at one click... | पद्म पुरस्कार २०२६: महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात! राज्यातील सर्व पुरस्कार विजेत्यांची यादी एका क्लिकवर...

पद्म पुरस्कार २०२६: महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात! राज्यातील सर्व पुरस्कार विजेत्यांची यादी एका क्लिकवर...

प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्राचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. महाराष्ट्राला यावर्षी एकूण १५ पद्म पुरस्कार मिळाले असून त्यात १ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी

राज्यातून तीन दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे: १. अलका याज्ञिक (कला): भारतीय संगीतातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी.

२. पीयूष पांडे (मरणोत्तर - कला): जाहिरात क्षेत्रातील जागतिक कीर्तीच्या कार्यासाठी.

३. उदय कोटक (व्यापार आणि उद्योग): बँकिंग आणि व्यापार क्षेत्रातील योगदानासाठी.

पद्मश्री पुरस्काराची मोहोर

क्रीडा, कला आणि समाजसेवा क्षेत्रात महाराष्ट्रातील खालील मान्यवरांना पद्मश्री जाहीर झाला आहे:

  • रोहित शर्मा (क्रीडा): भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार.

  • आर. माधवन (कला): प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक.

  • रघुवीर खेडकर (कला): तमाशा आणि लोककलेतील योगदानासाठी.

  • भिकल्या लाडक्या धिंडा (कला): पालघरमधील प्रसिद्ध तारपा वादक.

  • अर्मिडा फर्नांडिस (वैद्यकीय): नवजात बालकांच्या आरोग्यासाठी दिलेल्या योगदानासाठी.

  • श्रीरंग देवबा लाड (कृषी): शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी.

  • अशोक खाडे (व्यापार आणि उद्योग): यशस्वी उद्योजक आणि प्रेरणादायी प्रवास.

  • सत्यनारायण नुवाल (व्यापार आणि उद्योग): संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदान.

  • जुझेर वासी (विज्ञान आणि अभियांत्रिकी): वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधन.

  • जनार्दन बापुराव बोथे (समाजकार्य): सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ सेवा.

  • सतीश शहा (मरणोत्तर - कला): मनोरंजन क्षेत्रातील योगदान.

Web Title : पद्म पुरस्कार 2026: महाराष्ट्र का दबदबा, विजेताओं की पूरी सूची!

Web Summary : पद्म पुरस्कार 2026 में महाराष्ट्र छाया रहा, 15 पुरस्कार जीते। धर्मेंद्र सिंह देओल को मरणोपरांत पद्म विभूषण मिला। अलका याग्निक, पीयूष पांडे (मरणोपरांत), और उदय कोटक ने पद्म भूषण जीता। रोहित शर्मा, आर. माधवन और अन्य खेल, कला और समाज सेवा में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले पद्म श्री प्राप्तकर्ताओं में शामिल हैं।

Web Title : Maharashtra shines with Padma Awards 2026: Complete winners list!

Web Summary : Maharashtra dominated the Padma Awards 2026, securing 15 awards. Dharmendra Singh Deol posthumously received Padma Vibhushan. Alka Yagnik, Piyush Pandey (posthumous), and Uday Kotak won Padma Bhushan. Padma Shri recipients include Rohit Sharma, R. Madhavan, and others excelling in sports, arts, and social service.