शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

राज्यभरात ११ लाख विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 1:35 AM

दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणवाटा निवडणे सोपे जावे यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या कलचाचणीला राज्यभरात सुरुवात झाली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणवाटा निवडणे सोपे जावे यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या कलचाचणीला राज्यभरात सुरुवात झाली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. २ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात ११ लाख ५७ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी चाचणी दिली.परीक्षेसाठी ३ लाख ७० हजारपेक्षा जास्त मोबाइल फोन वापरण्यात आले आहेत. यामध्ये पुणे आघाडीवर असून तिथे तब्ब्ल १ लाख ९२ हजार ६६२ विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली आहे. तर मुंबईतील १ लाख८० हजार ७०१ विद्यार्थ्यांनी चाचणी दिली आहे. यंदा प्रथमच ही कलमापन चाचणी महाकरिअर मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्यात येत आहे. आत्तापर्यंत २० हजार २२१ शाळांनी कलचाचणीसाठी नोंदणी केल्याची माहिती मिळाली.शिक्षण विभागातर्फे तीन वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांची कल व अभिक्षमता चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट व कॉम्प्युटरची समस्या असल्याने या वर्षी प्रथमच ही चाचणी श्यामची आई फाउंडेशन, पुणे विद्यापीठाचा मानसशास्त्र विभाग, व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्या सहकार्याने ‘महाकरिअरमित्र’ पोर्टल व मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली आहे. १८ डिसेंबर २0१८ पासून राज्यातील विविध शाळांमध्ये ही चाचणी परीक्षा सुरू करण्यात आली. मोबाइलवर ही चाचणी घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या चाचणीला मिळत आहे. पुणे, मुंबईनंतर नाशिक १ लाख ५९ हजार ४५७ तर सर्वांत कमी कोकण भागातून २५ लाख ६३४ विद्यार्थ्यांनी चाचणी दिली. कलचाचणी देणारे सर्वाधिक विद्यार्थी हे भंडारा जिल्ह्यातील असून कलचाचणी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईची (डीवायडी) टक्केवारी सर्वांत कमी आहे.२३ जानेवारीपर्यंत शाळांमध्ये कल आणि अभिक्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये दहावीच्या १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. गेली तीन वर्षे ही चाचणी संगणकाच्या आधारे घेण्यात येत होती. मात्र यंदा श्यामची आई फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभाग व व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली अभिक्षमता चाचणी विद्यार्थी मोबाइल अ‍ॅपद्वारे देत आहेत.विभाग कलचाचणी पूर्णझालेले विद्यार्थीपुणे १,९२,६६५नागपूर १,२०,५४४औरंगाबाद १,४२,०५२मुंबई १,८०,७०१कोल्हापूर १,२२,०५९अमरावती १,२९,६८७नाशिक १,५९,४५७कोकण २५,६३४एकूण ११,५७,३३२

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी