शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘रिफायनरी’ला आमचा विरोधच; हिंमत असेल तर समर्थकांनी मोर्चा काढावा - नीतेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 16:36 IST

हिंमत असेल तर या रिफायनरीच्या बाजूने समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा, असे खुले आव्हान आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले. 

देवगड : विधानसभेत कायदा सुव्यवस्था हाती घ्यावी लागली तरी चालेल, मात्र आपण रिफायनरीला विरोध करणारच. आम्ही रिफायनरीच्या विरोधात रत्नागिरी, राजापूर, देवगड येथे मोर्चा काढले. जनतेने लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित राहून या रिफायनरीला आपला विरोध दाखविला आहे. त्यामुळे हिंमत असेल तर या रिफायनरीच्या बाजूने समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा, असे खुले आव्हान आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले. देवगड तालुका स्वाभिमानच्या कार्यालयात आमदार नीतेश राणे यांनी माहुल रिफायनरी व भविष्यात होणारी नाणार रिफायनरी या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संदीप साटम, नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेवक संजय तारकर, बापू जुवाटकर, उमेश कणेरकर, ज्ञानेश्वर खवळे, उष:कला केळुस्कर, प्रीती वाडेकर, शरद ठुकरुल आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना राणे म्हणाले, माहुल रिफायनरीमध्ये साडेचार हजार लोकांना नोक-या आहेत. मात्र त्या कंत्राटी पद्धतीवर आहेत. केवळ कंत्राटी पद्धतीवर नोक-या मिळविण्यासाठी कोकणचे आंबे, काजू व निसर्ग यांचा बळी द्यायचा का? असा प्रश्नही राणे यांनी केला. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे नाणार रिफायनरीचे समर्थन करतात. साळगावकर हे शिवसेनेचे असून मग त्यांची ही भूमिका वैयक्तिक आहे की शिवसेनेची अधिकृत आहे. याचा खुलासा आजतागायत झालेला नाही. यामुळे शिवसेनेची भूमिका आजतागायत संशयाची राहिली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे विधानसभेत कोणतेही उत्तर देण्याचे टाळतात हे त्याचेच द्योतक आहे. या रिफायनरी प्रकल्पामुळे देवगड व कणकवलीतील जनता घाबरलेली असून आपण ग्रामपंचायतींमध्ये दिलेले नाणार रिफायनरी संदर्भातील जिल्हाधिका-यांचे पत्र पाहिले  तर तुमच्या लक्षात येईल की या भागातील व्यवहार थांबविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत, असेही राणे म्हणाले.

...तर विनाश अटळ आहे !नाणार येथे अशाप्रकारची घटना घडली तर अग्निशामक दलाच्या ५० गाड्या व आरोग्य सुविधा येथील जनतेला उपलब्ध होणार आहेत, त्या ख-या अर्थाने आहेत का? अशा सुविधा माहुलमध्ये किती उपलब्ध झाल्या याचाही विचार करणे गरजेचे आहे. कोकणची आरोग्य सुविधा आधीच सलाईनवर असून अशाप्रकारचा अपघात झाल्यास विनाश अटळ आहे, असे मत आमदार राणे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग