शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आपलं सरकार मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल; उद्धव ठाकरेंची पंकजाताईंना ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 18:42 IST

राज्यातील राजकीय पेच आता संपुष्टात आला असून, उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर आलेलं आहे.

मुंबईः राज्यातील राजकीय पेच आता संपुष्टात आला असून, उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर आलेलं आहे. तर भाजपाला विरोधात बसावं लागलं आहे, विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही त्यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. उद्धव ठाकरेंना ट्विटरच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी शुभेच्छा देत आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!!एका ठाकरेंनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले. हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे, 'राज्याचे हित प्रथम '!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, असं पंकजाताई ट्विट करत म्हणाल्या होत्या, त्यावर आता उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे.उद्धव ठाकरेंनी ट्विटरच्याच माध्यमातून शुभेच्छांचा स्वीकार करत पंकजा मुंडेंचे आभार व्यक्त केले आहेत. आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजाताई मुंडे! 'राज्याचे हित प्रथम' याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल, असा विश्वास मी तुम्हाला देतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे भाजपामध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.  राज्यातील सत्ता हातची गेल्यानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला होता. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंसह अनेक वरिष्ठ नेत्यांची तिकिटं कापण्यात आली होती. पंकजा मुंडेंना बीडच्या परळीमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.या पराभवानंतर त्या सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर गेल्या आहेत. त्यांनी ट्विटरवरून भाजपा नावाचा उल्लेखदेखील काढून टाकला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार अशीही चर्चा सुरू आहे. सध्या पंकजा मुंडे आणि बहुजन समाजातील काही लोकप्रतिनिधी यांच्यात एक वेगळा गट तयार करण्यावर एकमत झालं आहे असल्याची माहिती मिळाली होती, तर दुसरीकडे पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, आता पंकजाताईंच्या ट्विटला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिल्यानं पुन्हा एकदा पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का?, या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPankaja Mundeपंकजा मुंडेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019