शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

"आमची बांधिलकी जनतेशी, ती मातोश्री ते सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 11:35 IST

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर या अग्रलेखामधून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देवनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेखाच्या माध्यमातून दखल घ्यावी लागली, हेही नसे थोडकेआमची बांधिलकी जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी मातोश्री तर कधी सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझारा घालत नाहीआम्ही पक्ष बदलले, पण ज्या पक्षात राहिलो, तिथे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल

मुंबई - सामनामधील अग्रलेखातून टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे. त्यामुळे आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी मातोश्री तर कधी सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही, असा टोला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर या अग्रलेखामधून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. या पत्रात विखे पाटील म्हणतात, सामनामध्ये माझ्यावर अग्रलेख लिहिल्याबद्दल आभार, तुमच्या भाषेत सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे. पण अशा वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेखाच्या माध्यमातून दखल घ्यावी लागली, हेही नसे थोडके.  मी राजकारणापासून दूर राहावे असा सल्लाही आपण दिलाय. पण जनताजनार्दनाच्या साक्षीने सांगतो की, मी तुमच्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे तुमच्या सल्ल्याने राजकारणाबाहेर जाण्याचा प्रश्नच नाही. मला माझ्या मुलाला, माझ्या घराण्याला  राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे. त्यामुळे आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी मातोश्री तर कधी सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय, असा दुटप्पीपणा कोण करतेय हे लपून राहिलेले नाही, असा चिमटाही विखेंनी यावेळी काढला.

‘’बाळासाहेबांच्या काळात अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख लिहिले जात. आजच्यासारखी लाचारी तेव्हा नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का? आम्ही पक्ष बदलले, पण ज्या पक्षात राहिलो, तिथे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल. मात्र मात्र तुमची छाती फाडून पाहिली तर त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोन नेते दिसतील, असा टोलाही विखे यांनी या पत्रातून लगावला.

मी भाजपात आनंदी आहे. पण स्वत:ला महाविकास आघाडीचा शिल्पकार म्हणवणाऱ्याला व्यक्तीला आपल्या भावाला मंत्रीदेखील करू न शकल्याचे दु:ख असेल आणि त्यातून आलेली अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल. पण त्यात माझा काय दोष. थोरांतांची कमळा असा काही उल्लेखही अग्रलेखात आहे. पण कमळ हातात घेण्यासाठी कुणी केव्हा, कुठे, कशी चाचपणी केली होती, हा वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती. तर हा उल्लेख कदाचित खरा ठरला असता. बाकी मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि कुणी वेळेवर यूटर्न घेतला, हा इतिहास अनेकांना माहीत आहेच. मी वेगळं काय सांगावं, असा चिमटाही विखे-पाटील यांनी पत्राच्या शेवटी काढला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण