शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

गणेशोत्सव-दहीहंडीसाठी प्रसंगी अध्यादेश

By admin | Updated: July 7, 2017 05:04 IST

राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवावर नियमांची टांगती तलवार आहे. उत्सव साजरे करण्यात येणाऱ्या कायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवावर नियमांची टांगती तलवार आहे. उत्सव साजरे करण्यात येणाऱ्या कायदेशीर अडचणींवर मात करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, आवश्यकता भासल्यास अध्यादेश काढण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दिली आहे, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करताना येणाऱ्या कायदेशीर अडचणीवर मार्ग काढण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहीबावकर यांच्यासह पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर आदी मंडळींसह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. केंद्रीय पर्यावरण कायद्यातील नियमांमुळे तब्बल ८० टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर गदा येण्याची शक्यता आहे. तर, दहीहंडी उत्सवावरही नियमांची टांगती तलवार आहे. पर्यावरण कायद्याची नियमावली तयार होण्याच्या कित्येक वर्षे आधीपासून गणेशोत्सव आणि दहीकाल्याचा उत्सव साजरा होत आहे. हॉस्पिटल, शाळा किंवा शांतता क्षेत्रापासून शंभर मीटरपर्यंत उत्सव साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव संकटात आले आहेत. अनेक ठिकाणी तर अगदी अलीकडेच हॉस्पिटल वगैरे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे सार्वजनिक मंडळे कायद्याच्या कचाट्यात सापडली आहेत. दोन्ही उत्सव निर्धोकपणे साजरे करता यावेत यासाठी केंद्रीय पर्यावरण कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असून, राज्य सरकारने याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी सार्वजनिक उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. शिवाय, कायद्यात दुरुस्ती होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे उत्सव उत्साहात साजरे करता यावेत यासाठी अध्यादेश काढण्याची मागणीही मंडळांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली. तसेच आवश्यकता भासल्यास अध्यादेश जारी करण्याचे आश्वासन दिल्याचे नरेश दहीबावकर यांनी बैठकीनंतर सांगितले. दहीहंडी उत्सवाबाबत १० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या वेळी दहीहंडी मंडळाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील तुषार मेहता यांची नेमणूक केली आहे. मागील वर्षी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांनी केली. यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.शांतता क्षेत्राबाबत निवेदन सादरगणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवांच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपातील कुरघोडीचे राजकारण पुन्हा एकदा समोर आले. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याआधीच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शांतता क्षेत्राबाबत आपले निवेदन सादर केले. हिंदूंच्या सणांच्या वेळी कायद्याचा अडसर का येतो, असा सवाल शिवसेनेने केला. शिवसेनेचा जन्मच उत्सवातून झाला आहे. भाजपाचे काही लोक सत्ता आल्यानंतर पावसाळ्यातील छत्रीसारखे उगवले आहेत, अशा शब्दांत शिवसेना आमदार अनिल परब यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली.