सहकारमंत्र्यांच्या कारखान्याची खाती गोठविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:27 AM2019-01-05T01:27:34+5:302019-01-05T01:28:37+5:30

सेबीने १६ मे २०१८ रोजी गुंतवणूकदारांची रक्कम ३ महिन्यांत परत देण्याचे आदेश ‘लोकमंगल’ला दिले होते; मात्र कार्यवाही न झाल्याने ३ जानेवारी रोजी सेबीने नोटीस धाडली.

 Order for freezing the accounts of the cooperative factory | सहकारमंत्र्यांच्या कारखान्याची खाती गोठविण्याचा आदेश

सहकारमंत्र्यांच्या कारखान्याची खाती गोठविण्याचा आदेश

Next

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीसाठी शेतकऱ्यांकडून घेतलेली ७४ कोटी ८२ लाख एक हजार रुपयांची शेअर्सची रक्कम १५% व्याजासह परत करण्यात अपयशी ठरल्याबद्दल कंपनी व संचालकांची डिमॅट व म्युच्युअल फंडस्ची खाती गोठविण्याचा आदेश ‘सेबी’ने दिला.
सेबीने १६ मे २०१८ रोजी गुंतवणूकदारांची रक्कम ३ महिन्यांत परत देण्याचे आदेश ‘लोकमंगल’ला दिले होते; मात्र कार्यवाही न झाल्याने ३ जानेवारी रोजी सेबीने नोटीस धाडली. त्यानुसार संचालक व देशमुख यांच्या पत्नी स्मिता, पुतणे महेश, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, वैजिनाथ लातुरे, औदुंबर देशमुख, गुरण्णा तेली आणि पराग सुरेश पाटील यांच्यासह साखर कारखान्याची खाती गोठविण्याचे आदेश दिले.

‘सेबी’च्या नियमांचे आम्ही उल्लंघन केले नसून, तीन महिन्यात शेअर्स परत केले आहेत.
- सुभाष देशमुख,
सहकारमंत्री, महाराष्टÑ राज्य

Web Title:  Order for freezing the accounts of the cooperative factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.