शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"स्वतःच्या पक्षाने चुकीचे निर्णय घ्यावे अन्..."; विजय वडेट्टीवार यांचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 12:18 IST

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारनेकांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे आता कांद्याला चांगला भाव मिळेल, अशा अपेक्षेने शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. मात्र, कांदा निर्यातबंदी हटवल्याच्या निर्णयाचा आनंद काही काळापुरताच राहिल्याचे निष्पन्न झाले. निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंगयांनी कांदा निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत लागू राहील असे वक्तव्य केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा मावळल्या आहेत. शिवाय निर्णयाबाबत सरकारामध्येच संभ्रम असल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी हटवण्यात आल्याचा जल्लोष करून स्वतः श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यातील भाजपाचे मंत्री आणि नेत्यांनी केल्याचे आता उघड झाले आहे. गाजावाजा करत जल्लोष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा भाजपाचा हा प्रयत्न होता का?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

निर्यात बंदी उठवण्यात आलेली नाही. सद्या:स्थितीत केंद्र सरकारच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही.असे केंद्राकडून सांगण्यात आलेले आहे. लोकसभा निवडणुक पूर्ण झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वतःच्या पक्षाने चुकीचे निर्णय घ्यावे आणि नंतर तो निर्णय बदलून शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे आव आणणे आता भाजपाने बंद करावे. निवडणूक आणि श्रेयवादाचं राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या हिताचे राजकारण करण्याकडे भाजपाने लक्ष द्यावे, असं आवाहन देखील विजय वडेट्टीवर यांनी केलं आहे. 

कोण काय म्हणाले? 

कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले की, कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम असून मुळात कांदा निर्यातबंदी उठवलीच नव्हती. मात्र या घोषणेमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. आम्ही हेच सांगितलं की, जोपर्यंत केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी उठल्याचं अधिकृत नोटिफिकेशन निघत नाही, तोपर्यंत यावर विश्वास ठेवता येणार नाही. सरकारने तत्काळ कांदा निर्यात बंदी हटवली नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांकडून  मतपेटीतून याचे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिघोळे यांनी दिला आहे. तर निर्यात खुली होणार या आशेने शेतकऱ्यांनी कांदा घरात साठवला, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून निर्यात खुली होण्याच्या चर्चा होत्या. मात्र निव्वळ घोषणा झाली. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना फसवलं असल्याचे मात शेतकरी संघटनेचे निवृत्ती न्याहारकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारonionकांदाCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र