'अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू...'; देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 06:05 PM2021-11-16T18:05:48+5:302021-11-16T18:10:57+5:30

'राहुल गांधी एक ट्वीट करतात आणि लगेच हिंसाचार घडतो, हे नियोजनाशिवाय होऊ शकत नाही. यामागे खूप मोठं षडयंत्र आहे.'

Opposition leader Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi and Shivsena MP Sanjay Raut | 'अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू...'; देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर जहरी टीका

'अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू...'; देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर जहरी टीका

googlenewsNext

मुंबईः आज भाजपाच्या कार्यकारणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही जहरी शब्दात टीका केली. 'संजय राऊत यांची अवस्था म्हणजे कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू,' अशी झाल्याची टीका फडणवीसांनी केली. तसेच, त्रिपुरामध्ये घडलेली घटना सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंसाचार घडवल्याचा आरोपही फडणवीसांनी यावेळी केला.

भाजपाचा कार्यकर्ता कधीही दंगल करणार नाही
यावेळी फडणवीस म्हणाले की, आम्ही मतांचे राजकारण कधीही करत नाही, आम्हाला देश महत्त्वाचा आहे. अमरावती, नांदेड, मालेगाव हा फक्त ट्रेलर होता, देशात अराजकता निर्माण करण्यासाठी अल्पसंख्याकांना भडकवलं जात आहे. जी घटना घडलीच नाही त्याबद्दल चुकीचं वातावरण निर्माण करुन दंगल घडवली जात आहे. 26 ऑक्टोबरला बांग्लादेशातील हिंदुवरील अत्याचाराच्या निषेधार्थ त्रिपुरात रॅली निघते. त्यात कुठेही हिंसाचार झाला नाही. मात्र सोशल मीडियावर सीपीआयएमच्या कार्यालयाला आग लागली तो फोटो दाखवून मस्जिदीला आग लागल्याचं सांगितले गेले. जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून त्यावर हिंदू मोठ्या प्रमाणात त्रिपुरात मुस्लिमांवर हल्ला करत आहेत असं सांगितले जाते. देशात चुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असंही ते म्हणाले.

पैशांची सगळी माहिती सरकारला आहे
फडणवीस पुढे म्हणतात की, हे षडयंत्र उघडं होऊ नये म्हणून नवाब मलिकांना पुढे करुन बचाव केला जात आहे. पैसे कुठून कसे आणि कुणाला दिले याची सगळी माहिती सरकारला असल्यामुळे मलिकांना पुढे करुन विषय भरकटवला जातोय. आझाद मैदानात ज्यावेळी अशा प्रकारची घटना घडली तेव्हा पोलीस जखमी झाले. एसआरपीएफच्या 5 जवानांना गंभीर जखमी केले ते कोण होते? ज्या परिसरात दंगल झाली तिथं दगडं आली कशी? पोलीस जवानांवर हल्ला झाल्यानंतरही एकालाही अटक झाली नाही. ठरवून पोलिसांवर हल्ला केला गेला. या देशात मोदींच्या विकासाला उत्तर देता येत नाही तेव्हा लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काम राज्य सरकार करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राहुल गांधी ट्वीट करतात आणि...
यावेळी फडणवीसांनी राहुल गांधींवरही टीका केली. फडणवीस म्हणाले, 8 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये 11 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले. कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. नियोजन झाले असेल तर सरकार, आयबी, गुप्तचर, पोलिसांना कसे काय माहित नाही ? असा सवाल त्यांनी केला. या साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडे शिवली गेली, असंही ते म्हणाले. 
 

Web Title: Opposition leader Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi and Shivsena MP Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.