शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Opinion Poll: महाराष्ट्रात आघाडीचा 'ट्रिपल धमाका', युतीला 'डझना'चा फटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 18:17 IST

१७ व्या लोकसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात युती आणि आघाड्यांची मोर्चेबांधणीही झाली आहे. दरम्यान, आज लोकसभेची निवडणूक झाल्यास महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा युतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे आज लोकसभेची निवडणूक झाल्यास महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा युतीला फटका बसण्याची शक्यता असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांमध्ये घसघशीत वाढ होण्याचा अंदाजआज निवडणूक झाली तर शिवसेना आणि भाजपा युतीला १२ जागांवर फटका बसणार असून, युतीला ३० जागांवर समाधान मानावे लागेल२०१४ च्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या आघाडीची कामरिगी या निवडणुकीत सुधारण्याची शक्यता असून आघाडीला एकूण १८ जागा मिळतील

मुंबई - १७ व्या लोकसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात युती आणि आघाड्यांची मोर्चेबांधणीही झाली आहे. दरम्यान, आज लोकसभेची निवडणूक झाल्यास महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा युतीला फटका बसण्याची शक्यता असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांमध्ये घसघशीत वाढ होण्याचा अंदाज झी २४ ने केलेल्या सर्व्हेमधून समोर आला आहे. या सर्व्हेनुसार राज्यात आज निवडणूक झाली तर शिवसेना आणि भाजपा युतीला १२ जागांवर फटका बसणार असून, युतीला ३० जागांवर समाधान मानावे लागेल. तर २०१४ च्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या आघाडीची कामरिगी या निवडणुकीत सुधारण्याची शक्यता असून आघाडीला एकूण १८ जागा मिळतील असा अंदाज आहे. या सर्वेमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात भाजपाला १६, शिवसेनेला १४, राष्ट्रवादीला १०, काँग्रेसला ७ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र राज ठाकरेंची मनसे आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकाही जागेवर विजय मिळणार नाही, असे या सर्व्हेत म्हटलेआहे. 

विभागवार पाहिल्यास मुंबईत शिवसेना आणि भाजपा युतीचा  वरचष्मा राहणार आहे. येथील ६ पैकी पाच जागा शिवसेना भाजपा युतीच्या पारड्यात जातील. तर केवळ एका जागेवर काँग्रेसला विजय मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणामध्ये शिवसेनेचे एकतर्फी वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. कोकणातील सहा पैकी पाच जागांवर शिवसेनेला विजय मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाच्या खात्यात एक जागा जाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विभागात अपेक्षित यश मिळणार नाही. तसेच नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षालाही खाते उघडता येणार नाही.

उत्तर महाराष्ट्रातील ८ जागांपैकी चार जागा भाजपाला तर शिवसेनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला दोन आणि राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र राष्ट्रवादीचे वर्चस्व राहणार आहे. राष्ट्रवादी ५ तर काँग्रेसला एक जागा मिळेल, तर भाजपाला २ आणि शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. स्वाभिमानीच्या खात्यात एक जागा जाईल. मराठवाड्यामध्ये युती आणि आघाडीत अटीतटीच्या लढाई आहे. येथील आठ जागांपैकी भाजपाला ३ आणि शिवसेनेला १ जागा मिळेल. तर काँग्रेसला २ आणि राष्ट्रवादीला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये मात्र युतीचा बोलबाला राहण्याची शक्यता आहे. येथील दहा जागांपैकी ४ जागा भाजपाला तर ३ जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात राष्ट्रवादीला २ आणि काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागेल.  

महाराष्ट्र एकूण जागा - ४८ शिवसेना-भाजपा  युती - ३० काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी १८

विभागवार जागांचा अंदाज

मुंबई  -  भाजपा २, शिवसेना ३ , काँग्रेस १, राष्ट्रवादी 0

कोकण - भाजपा १ , शिवसेना ५, काँग्रेस 0, राष्ट्रवादी 0, 

उत्तर महाराष्ट्र - भाजपा ४ , शिवसेना १ , काँग्रेस २ , राष्ट्रवादी १

पश्चिम महाराष्ट्र - भाजपा २, शिवसेना १, काँग्रेस १, राष्ट्रवादी - ५, स्वाभिमानी - १

मराठवाडा - भाजपा  ३ - , शिवसेना १, काँग्रेस २, राष्ट्रवादी २

विदर्भ - भाजपा - ४ , शिवसेना - ३ , काँग्रेस १, राष्ट्रवादी २

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस