शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
3
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
4
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
5
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
6
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
7
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
8
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
9
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
10
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
11
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
12
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
13
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
14
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
15
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
16
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
17
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
18
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
19
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
20
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:34 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप नेत्यांकडून शिंदे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या पक्षात घेतले जात असल्याने शिंदे गटाचे काही मंत्री कमालीचे नाराज होते.

जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ लागल्यात तशा महायुतीतील अंतर्गत धुसफूस आता शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाकडून होत असलेल्या 'ऑपरेशन लोटस'मुळे नाराज झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच खडसावल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप नेत्यांकडून शिंदे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या पक्षात घेतले जात असल्याने शिंदे गटाचे काही मंत्री कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला होता. या बैठकीनंतर गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांसारखे नेते आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी फडणवीस यांच्या दालनात पोहोचले होते.

पुराव्यासह झाड झाड झाडलं!सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या मंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीतील भाजपच्या पक्षप्रवेशावर आक्षेप घेत, "तुम्ही जे करत आहात, ते युतीच्या धर्माला धरून नाही," अशी तक्रार केली. यावेळी, शिंदे स्वतः उपस्थित होते. या आरोपांना उत्तर देताना, देवेंद्र फडणवीस यांनी थेट आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी केवळ मंत्र्यांचे आरोप फेटाळले नाहीत, तर त्यांनी लगेचच आपल्याकडे असलेल्या पुराव्यांची यादी वाचून दाखवली. तुम्ही केवळ तक्रार करत आहात, पण उल्हासनगरसह अनेक ठिकाणी तुमच्या गटाकडूनही अशाच प्रकारे पक्षप्रवेश केले जात आहेत, असे त्यांनी थेट सांगितले. सुरुवात तुम्हीच केली आहे, त्याचे प्रत्तूतर तुम्हाला दुसरीकडे मिळू लागले आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी या मंत्र्यांना झाडले आहे. 

फडणवीसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अलीकडे झालेल्या राजकीय प्रवेशांची यादी वाचून दाखवल्याने, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच या नाराज मंत्र्यांची मोठी कोंडी झाली. युतीचा धर्म पाळला जात नसल्याची मंत्र्यांची तक्रार होती, मात्र फडणवीसांनी त्याच "युती धर्माचा" मुद्दा उपस्थित करत त्यांना शांत केले. यामुळे, मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून आलेले हे मंत्री आणखीनच अडचणीत सापडले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra coalition strains: Fadnavis confronts Shinde's ministers over 'Operation Lotus'.

Web Summary : Cracks in Maharashtra's ruling coalition widen as Fadnavis rebukes Shinde's ministers regarding defections. Accusations flew, with Fadnavis presenting evidence of similar actions by Shinde's group, leaving ministers red-faced.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना