गणोशभक्तांसाठी पर्यायी मार्ग खुले

By Admin | Updated: August 16, 2014 22:33 IST2014-08-16T22:33:32+5:302014-08-16T22:33:32+5:30

गणोशोत्सवासाठी कोकणवासीय मोठय़ा प्रमाणात मुंबईतून कोकणात जातात.

Opening alternative routes for the Ganosh devotees | गणोशभक्तांसाठी पर्यायी मार्ग खुले

गणोशभक्तांसाठी पर्यायी मार्ग खुले

>जयंत धुळप- अलिबाग
गणोशोत्सवासाठी कोकणवासीय मोठय़ा प्रमाणात मुंबईतून कोकणात जातात. मुंबई-गोवा महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे यंदा पूर्वीच्या गणोशोत्सवापेक्षा अधिक वाहतुकीच्या कोंडीची शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे कोकणात जाणा:या गणोशभक्तांची अडचण होऊ नये, याकरिता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गास असणारे पर्यायी मार्ग वापरण्यात यावेत, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 
4मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (पळस्पे-खारपाडा टाळण्याकरिता)- मुंबई-वाशी-पामबीच-उरण फाटा-चिरनेर- खारपाडा-वडखळ-महाड.
4मुंबई-पुणो द्रुतगती मार्ग- (पळस्पे-पेण टाळण्याकरिता)-मुंबई-खालापूर टोलनाका-पेण-महाड
4मुंबई-पुणो द्रुतगती मार्ग- (पळस्पे-पेण-वडखळ टाळण्याकरिता)-मुंबई-खालापूर-पाली फाटा- जांभूळपाडा- पाली- वाकण-माणगाव-महाड
4मुंबई-पुणो द्रुतगती मार्ग- (पनवेल-महाड-कशेडी-खेड टाळण्याकरिता)- पुणो- सातारा-उंब्रज-पाटण-चिपळूण
4मुंबई-पुणो द्रुतगती मार्ग-(पनवेल-महाड-कशेडी-खेड टाळण्याकरिता)-सातारा-कराड-कोल्हापूर-मलकापूर अंबाघाट मार्गे रत्नागिरी
4मुंबई-पुणो द्रुतगती मार्ग-(मुंबई ते रत्नागिरी टाळण्याकरिता)- सातारा-कराड-कोल्हापूर-राधानगरीमार्गे कणकवली
4मुंबई-पुणो द्रुतगती मार्ग-(मुंबई ते रत्नागिरी टाळण्याकरिता) सातारा-कराड-कोल्हापूर-गगनबावडा मार्गे कणकवली.
4मुंबई-पुणो द्रुतगती मार्ग-(मुंबई ते रत्नागिरी टाळण्याकरिता)-सातारा-कराड-कोल्हापूर-आंबोली मार्गे सावंतवाडी.
4 वडखळ ते नागोठणो कोंडी झाल्या- वडखळ-पेझारी-नागोठणो-माणगाव-महाड हा मार्ग वापरावा.
 
पेण-भोगावती नदीवरील नवा पूल  कार्यान्वित करण्याचा प्रयत्न
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण येथील भोगावती नदीवर बांधलेल्या नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या मागील व पुढील बाजूकडील जागेच्या भूमी संपादनानिमित्त वाद होता. या ठिकाणी रायगडचे पालकमंत्री सचिन अहीर यांनी शुक्रवारी भेट दिली. जमिनीसंबंधित अडचणीबाबत जमीनमालकाबरोबरच चर्चा करु न त्यांची संमती तत्काळ मिळवून दिली. गणोशोत्सवाच्या दृष्टीकोनातून हा नवा पूल वाहतुकीस तत्काळ उपलब्ध होईल, असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी महामार्ग विस्तारीकरण कामाचे कंत्रटदार असलेल्या महावीर व सुप्रिम कंपनीच्या प्रतिनिधींना जागेवरच दिल्या. पूल कार्यान्वित झाल्यास वाहनांना जुन्या व धोकादायक पुलावरुन जावे लागणार नाही. 
 
धोकादायकरीत्या ओव्हरटेक 
करणा:या वाहनांवर कारवाई
गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन कोकणात गणोशोत्सावाकरिता जाणा:या वाहनांची संख्या दरवर्षी मोठय़ा प्रमाणात वाढते. वाहतूक नियम व पोलिसांच्या सूचनेप्रमाणो वानचालकांनी आपली वाहने चालविल्यास वाहतूक कोंडी टाळता येवू शकते. मात्र पुढे जाण्याच्या नादात, वाहन चालक वाहतूक नियम डावलून धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करुन वाहतूक कोंडीस कारण ठरतात. असे वाहन चालकांनी करु नये या करिता खारपाडा टोल नाका येथे वाहन चालकांना रायगड पोलीसांकडून सूचना देण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी सांगितले. या सूचना न पाळता धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणा:या वाहनचालकांवर सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. 

Web Title: Opening alternative routes for the Ganosh devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.