...तरच शरद पवार पंतप्रधान होतील, रोहित पवारांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 19:29 IST2020-02-04T19:24:53+5:302020-02-04T19:29:17+5:30
साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे.

...तरच शरद पवार पंतप्रधान होतील, रोहित पवारांचा विश्वास
मुंबईः येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही, असंही विधान रोहित पवार यांनी केलं आहे. साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडी जशी राज्यात एकत्र आहे तशी देशातही एकत्र लढली तर आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. शरद पवार पंतप्रधान बनू शकतात, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
पवार साहेबांना सामान्यातला सामान्य माणूस ओळखतो, पवार साहेब कुठेही गेले की, ते लोकांची आत्मीयतेनं विचारपूस करतात. साहेबांचा लोकांवर आणि लोकांचा साहेबांवर विश्वास आहे. लोकांचा विश्वास नसल्यास एखाद्या नेत्यालाही हातात बूट घ्यावे लागतात. अशा प्रकारचा विश्वास आम्हाला नको, असंह म्हणत रोहित पवारांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
भाजपाचे नेते महाविकास आघाडीचं सरकार फोडण्याचं काम करत आहेत, मुनगंटीवारांनी असं बऱ्याचदा बोलून दाखवलं आहे, परंतु त्यांना अद्याप यश आलेलं नाही आणि यापुढेसुद्धा यश मिळणार नाही, असं म्हणत रोहित पवारांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.