शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

ऊस उत्पादकाशी करार असेल तरच 'एफआरपी' चे तुकडे पाडता येणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 11:32 IST

सलग दुसऱ्या हंगामात राज्यात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. साखरेला उठाव नसल्याने अनेक कारखान्यांना एफआरपीची रक्कम देता आली नव्हती. ..

ठळक मुद्देप्रत्येक सभासदाशी करार आवश्यक : सर्वसाधारण सभेतील कराराचा ठराव अमान्य होणारगेल्या हंगामातील १४५ लाख टन साखर शिल्लकशेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक

पुणे : अगामी साखर हंगामामधे ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दरासाठी (एफआरपी) बहुतांश साखर कारखाने कारार पद्धतीचा अवलंब करण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्यासाठी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठराव पुरेसा ठरणार नाही. ऊस घालणाºया प्रत्येक सभासदासोबत स्वतंत्र करार करणे कारखान्यांना बंधनकारक असल्याचे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले. सलग दुसऱ्या हंगामात राज्यात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. साखरेला उठाव नसल्याने अनेक कारखान्यांना एफआरपीची रक्कम देता आली नव्हती. त्यामुळे विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. त्यामुळे केंद्रसरकारला साखरेचा हमीभाव २९०० रुपये प्रति क्विंटलवरुन ३१०० रुपये करावा लागला. शुगरकेन कंट्रोल कायदयानुसार १९६६ नुसार शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित शेतकऱ्यास व्याजासह एफआरपी द्यावी लागते. आगामी गाळप हंगामात देशात २६३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज असून, गेल्या हंगामातील १४५ लाख टन साखर शिल्लकी आहे. देशांतर्गत साखरेचा खप हा २६० लाख टन इतका आहे. त्यामुळे यंदा देखील साखरेला फारसा भाव मिळणार नसल्याची स्थिती आहे. एफआरपीवरुन झालेल्या आंदोलनानंतर शुगरकेन कंट्रोल कायद्यातील मधील तरतूद, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी प्रकाशात आणली. त्या नुसार एखाद्या कारखान्याने प्रत्येक सभासदाशी एफआरपी बाबत करार केल्यास त्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम एकाच वेळी देण्याचे बंधन नाही. त्यामुळे गेल्यावर्षी साखर हंगाम तीस टक्के उरकल्यानंतर काही कारखान्यांनी असे करार करण्यास सुरुवात केली. काहींनी सर्वसाधारण सभेत ठराव केल्याचे सांगितले. गेल्यावर्षी प्रथमच १९५ सहकारी आणि खासगी कारखान्यांपैकी सुमारे ६० कारखान्यांनी करार केले होते. त्यात एफआरपीच्या ७५ टक्के १४ दिवसांत आणि उर्वरीत रक्कम बैलपोळा आणि दिवाळीला समान हप्त्यात देण्याचे करार काहींनी केले. यंदा या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. ------------------------

शुगरकेन कंट्रोल कायद्यानुसार कारखान्याने प्रत्येक सभासदाशी एफआरपीबाबत करार न केल्यास त्यांना १४ दिवसांत ऊस बिल देणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक सभासदाशी करार आवश्यक आहे. सर्वसाधारण सभेत केलेला कराराचा ठराव ग्राह्य धरला जाणार नाही. शेखर गायकवाड, साखर आयुक्त  

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार