Only enough blood for five to seven days in the state; Emphasis on patient difficulties | राज्यात पाच ते सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा; रुग्णांच्या अडचणींमध्ये भर

राज्यात पाच ते सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा; रुग्णांच्या अडचणींमध्ये भर

मुंबई : कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने  पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पाच ते सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याने हे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉपोर्रेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत. राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या २ हजार ५८३ युनिट आणि मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे. 

शिबिरे भरवण्याचे आवाहन
येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायट्यांना रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. रक्तदात्यांना देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Only enough blood for five to seven days in the state; Emphasis on patient difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.