शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

'इंजिनीअर' शेतकऱ्याने एका एकरातून वर्षभरात कमावले साडेनऊ लाख

By अोंकार करंबेळकर | Updated: September 14, 2017 19:52 IST

तरुण पिढी शेतीकडे करिअर म्हणून सोडाच कर उपजिविकेचे साधन म्हणून देखिल पाहायला तयार नाही.

ठळक मुद्देयूपीएल कंपनीचे झेबा उत्पादन वापरणाऱ्या जुन्नर, पुरंदर अशा अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी झेबामुळे डाळिंब, टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेतलं. पण जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या वैभव मुराद्रे या शेतकऱ्याच्या जिद्दीची कहाणी थक्क करायला लावणारी आहे.इंजिनिअर असूनही त्याने शेतीच करायची ठरवली आणि  एक  एकर शेतीतून त्याने साडेनऊ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

ओतूर, दि१४- शेतीत काहीच राहीलं नाही, शेतात फुकट कष्ट करत राहण्यापेक्षा पोटापुरती नोकरी मिळवावी आणि पगाराच्या दिवसाची वाट पाहात महिने काढावेत असाच सर्वसाधारण विचार आजकाल देशातील शेतकऱ्यांच्या मनात आहे. तरुण पिढी शेतीकडे करिअर म्हणून सोडाच कर उपजिविकेचे साधन म्हणून देखिल पाहायला तयार नाही. पण जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या वैभव मुराद्रे या शेतकऱ्याच्या जिद्दीची कहाणी थक्क करायला लावणारी आहे. इंजिनीअर असूनही त्याने शेतीच करायची ठरवली आणि  एक  एकर शेतीतून त्याने साडेनऊ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. ओतूर येथे झालेल्या किसान महाचर्चेमध्ये त्याने आपल्या प्रयत्नांची गोष्ट इतर शेतकऱ्यांना सांगितली तेव्हा सर्व शेतकरी थक्कच झाले. या महाचर्चेमध्ये यूपीएल कंपनीचे झेबा उत्पादन वापरणाऱ्या जुन्नर, पुरंदर अशा अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवांचे कथन केले.  झेबामुळे डाळिंब, टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेता आले असे या शेतकऱ्यांनी सांगितले. 

वैभव म्हणतो, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर १०-१५ हजार रुपयांची नोकरी करण्याचा पर्याय समोर होताच पण दुसरीकडे घरची ४ एकर शेतीही होती. त्यामुळे त्याने शेतीतच कष्ट करुन दाखवायचा निर्णय घेतला. पहिली एकदोन वर्षे योग्य हमीभाव न मिळाल्याने त्याला काही पिकांमध्ये तोटाही सहन करावा लागला, पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. या वर्षी त्याने एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली आणि त्यासाठी यूपीएल कंपनीचे झेबा तंत्रज्ञान वापरले. मक्याच्या स्टार्चपासून केलेल्या झेबामुळे रोपांच्या मुळांना योग्य प्रमाणात व सतत अन्नद्रव्ये आणि पाण्याचा पुरवठा होत राहिला, त्यामुळे इतरांपेक्षा वैभवच्या पिकांची वाढ व पर्यायाने उत्पन्नही भरपूर मिळाले. घरच्या सर्व लोकांनी मनापासून कष्ट केले तर शेतीसारखा व्यवसाय नाही असे वैभवचे मत आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या भीतीने रात्रीच्या वेळेस कांदा भरायला माणसे मिळत नसत तसेच येणाऱ्या लोकांना एका रात्रीसाठी एक हजार रुपये रोज द्यावा लागे. हे आव्हानही वैभवच्या कुटुंबाने स्वीकारले आणि ते स्वत:च कांदा भरायच्या कामाला लागले. यातून बचतही झाली. एक एकर शेतीसाठी त्याला दीड लाख खर्च आला आणि त्याला साडेनऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. टोमॅटोबरोबर कांदा, काॅलीफ्लाॅवर अशी पिकेही घेतो.

वैभवने शेतीत केलेल्या या प्रयोगाबद्दल त्याची काही मतं ठाम आहेत. यंदाच्या हंगामातील अनुभवानंतर तो सरळ सांगतो, माझा माझ्या कष्टावर आणि स्वकर्तृत्त्वावर विश्वास आहे, झेबासारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्याकडे माझा कल वाढला आहे. झेबामुळे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली झाली आणि रोपेही कमी प्रमाणात मेली, पाणी व्यवस्थापनही उत्तम झाले. त्यामुळे माझ्या शेतातील टोमॅटोचा आकारही एकसारखा होता आणि त्याला भाव चांगला मिळाला. आम्हाला भीक दिल्यासारखी कर्जमाफी नकोय आम्हाला फक्त हमीभाव द्या, बास! आम्ही या काळ्या मातीतून सोनं पिकवून दाखवू !

झेबामुळे शेती उत्पादनात क्रांती झेबा हे मक्याच्या स्टार्चपासून तयार केलेले उत्पादन आहे. आपल्या वजनाच्या चारशे पट पाणी धरुन ठेवणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शोषलेले पाणी योग्यवेळेस सतत मुळांना देत राहणं हे झेबाचं मुख्य काम आहे, मुळांभोवती पाणी व पोषकद्रव्ये साठवल्यामुळे पिकांना मोठा फायदा होतो. वाहून जाणारी पोषकद्रव्ये रोखल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते, इतकेच नव्हे तर जमिनीत हवा खेळती राहून जमिनीचा पोतही सुधारण्यास मदत होते. कांदा, डाळिंब, फ्लॉवर, टोमॅटो अशा विविध पिकांसाठी आम्ही झेबा वापरलं आहे. त्यामुळे पिके चटकन व सशक्त उभारीस घेत असल्याचं दिसून आलं आहे आणि फुले गळण्याचं प्रमाण कमी झालं. साहजिकच फळधारणेत वाढही दिसून आली. फळांचे आकार व गुणवत्ता चांगली वाढल्याने शेतक-यांच्या उत्पादनात क्रांतीकारक बदल दिसून आले आहेत.- समीर टंडन, क्षेत्रीय संचालक, यूपीएल 

झेबामुळे उत्पन्नात ३५% वाढएकेकाळी आमच्या गावात डाळिंबाला किंवा इतर पिकांना टॅकरने पाणी द्यावं लागे, पण मी झेबा वापरायला सुरुवात केल्यानंतर डाळिंबाला दिलेल्या पाण्याची बचत होऊ लागली. पाण्याच्या पाळ्या कमी झाल्या. मी गेली २५ वर्षे शेती करतोय पण गेल्या १६ ते १७ वर्षांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा यावर्षी झेबामुळे उत्पन्नात ३५% वाढ झाल्याचे दिसून आले. एका डाळिंबांचे वजन ४०० ग्रॅम पर्यंत तर सर्वाधिक ७०० ग्रॅम वजनापर्यंत फळ वाढल्याचे दिसून आले.- राहुल भोसले, कोथळे, ता.पुरंदर, जि. पुणे                

टॅग्स :Farmerशेतकरी