कर्जमाफी नोंदणीसाठी तहसीलमध्ये मदत कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:29 PM2017-09-13T23:29:53+5:302017-09-13T23:30:20+5:30

महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत भंडारा जिल्हयातील सर्वच तालुक्यातील पात्र शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यासाठी ......

Helpline for Tehsil Registration | कर्जमाफी नोंदणीसाठी तहसीलमध्ये मदत कक्ष

कर्जमाफी नोंदणीसाठी तहसीलमध्ये मदत कक्ष

Next
ठळक मुद्देअर्ज भरण्यासाठी १७५ केंद्र कार्यान्वित : नि:शुल्क अर्ज भरण्याची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत भंडारा जिल्हयातील सर्वच तालुक्यातील पात्र शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असून या कालावधीत शेतकºयांना सर्व्हर तसेच इतर तांत्रिक अडचणी आल्यास त्यासाठी सर्व उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयात उद्यापासून मदत कक्ष उघडण्यात येणार आहेत. आॅनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड नसले तरी नोंदणी होणार असून शेतकºयांनी १५ सप्टेंबर पर्यंत आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे. अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यामध्ये भंडारा जिल्हयाचे काम आतापर्यंत ९५ टक्के झाले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.बी. तरकसे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., शिल्पा सोनाले, अर्चना मोरे, अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर, जिल्हा बँक महाव्यवस्थापक संजय बरडे व सर्व तहसिलदार उपस्थित होते.
आॅनलाईन अर्ज नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस उरले असून या दोन दिवसात पात्र प्रत्येक शेतकºयाची नोंदणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आज झालेल्या बैठकीत यंत्रणेला दिले. यासाठी तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालयात मदत कक्ष उघडण्यात येत असून ज्या शेतक?्यांना नोंदणीसाठी अडचणी निर्माण होतात. त्यांनी मदत कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांना आॅनलाईन नोंदणीमध्ये अडचणी निर्माण होतील अशा शेतक?्यांनी आपली माहिती मदत कक्षात नोंदवावी. आधार कार्ड नसले तरी नोंदणी करता येणार असून नोंदणी झाल्यावर आधारकार्ड काढून आधार नंबर देण्याची सुविधा शासनाने दिली आहे. सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार आणि सहाय्यक निबंधक यांनी एकही शेतकरी नोंदणीतून सुटता कामा नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
देशातील सर्वात मोठा असा ३४ कोटीचा कर्जमाफीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून कुठलीही अट न ठेवता सरसकट अशी कर्ज माफीची योजना असून त्यामध्ये शेतकºयांची दिड लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील ३६ लाखांपेक्षा अधिक शेतकºयांचा सातबारा कोरा होण्यास मदत होणार आहे. या योजनेचा भंडारा जिल्हयातील अंदाजे ९५ हजार शेतकºयांना लाभ मिळणार आहे.
सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँक मिळून जिल्हयातील एक लाख १७ हजार ९९४ खातेदारांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे. त्यापैकी कर्ज घेणारे सभासद आणि नियमित कर्ज भरणारे सभासद मिळून अंदाजे ९५ हजार शेतकºयांना कृषी सन्मान कर्ज माफी योजनेचा लाभ मिळणार आहे. यात ७१ हजार ६०७ शेतकरी नियमित कर्ज भरणा करणारे आहेत. जिल्हयात एक लाख १७ हजार ९९४ शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समाविष्ट होतील. यापैकी काही शेतकरी अपात्र ठरु शकतात. त्यामुळे सरासरी 95 हजार शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आॅनलाईन अर्ज भरुन घेण्यासाठी जिल्हयात १७५ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये आपले सरकार महाआॅनलाईन व सी.एस.सी. केंद्रांचा समावेश आहे. भंडारा-३१, तुमसर-२७, मोहाडी-२१, पवनी-२५, लाखनी-२३, साकोली-२७ व लाखांदूर-२१ केंद्राचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर शेतकºयांकडून कुठलेही मुल्य न आकारता अर्ज भरुन देण्याची सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त काही खाजगी केंद्रांकडून शेतकरी आपला अर्ज आॅनलाईन अपलोड करु शकतात.
प्रशासनाच्या वतीने सर्व राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँक, तहसिल, पंचायत समिती व शासकीय कार्यालयात अजार्चे नमुने उपलब्ध करुन दिले आहेत. अर्ज आॅनलाईन भरण्याच्या केंद्रावर अर्ज भरुन देण्याची सुविधा असली तरी शेतकºयांची वैयक्तिक माहिती त्यांनी स्वत: भरावयाची आहे. यासाठी गटसचिव त्यांना सहकार्य करणार आहेत. या सोबतच ३६८ कृषि सहकारी सोसायटयामध्ये केंद्र निश्चित केले आहे. या ठिकाणी सुध्दा अर्ज भरण्यात येणार आहे.

Web Title: Helpline for Tehsil Registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.