दसºयापूर्वी कर्जमाफी द्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:59 AM2017-09-12T00:59:55+5:302017-09-12T00:59:55+5:30

शेतकºयांना दसºयापूर्वी कर्जमाफी द्यावी, ६६ प्रकारच्या माहितीचा अर्ज भरण्याची अट शिथिल करा, यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला

 Give debt relief before Dasara | दसºयापूर्वी कर्जमाफी द्या...

दसºयापूर्वी कर्जमाफी द्या...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेतकºयांना दसºयापूर्वी कर्जमाफी द्यावी, ६६ प्रकारच्या माहितीचा अर्ज भरण्याची अट शिथिल करा, यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. शेतकºयांना सरसकट क र्जमाफी द्या, शिवसेना जिंदाबाद, यासह विविध घोषणा देत आणि हाती विविध मागण्यांचे फलक घेऊन शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकातून काढण्यात आलेल्या या मोर्चाचा समारोप विभागीय आयुक्त कार्यालयावर झाला.
शेतकºयांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला दोन महिने उलटले तरीदेखील अद्याप एकाही शेतकºयाला कर्जमाफी मिळालेली नाही. शेतकºयांना कर्जमाफीचे आॅनलाइन फॉॅर्म भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ५०० केंद्रांवर आॅनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा असल्याचे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात केवळ ५०० केंद्रांवरच आॅनलाइन फॉर्म भरले जात आहेत. एका केंद्रावर प्रतिदिन २० ते २५ शेतकºयांनाच अर्ज भरणे शक्य होते. ही बाब लक्षात घेऊन अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, शेतकºयांकडून भरण्यात येणाºया अर्जांमध्ये ६६ प्रकारची माहिती अनावश्यक आहे. यामुळे शेतकºयांना नाहक जाच आणि त्रास होत असल्याने यातून शेतकºयांची मुक्तता करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी संपूर्ण राज्यात जिल्हास्तरीय मोर्चे काढण्यात आले. औरंगाबादेतही शिवसेनेने मोर्चा काढला.

Web Title:  Give debt relief before Dasara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.