शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात केवळ ६९ टक्के पाऊस : देशात १०१ टक्के बरसला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 21:58 IST

पावसाळ्यातील तीन महिने संपत असताना मराठवाड्यात केवळ ६९ टक्के पाऊस पडला असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सर्वात कमी आहे़. 

पुणे : पावसाळ्यातील तीन महिने संपत असताना मराठवाड्यात केवळ ६९ टक्के पाऊस पडला असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सर्वात कमी आहे़.  एलनिनोमुळे यंदा भारतात मॉन्सूनला मोठा फरक पडण्याची शक्यता असल्याची परदेशातील अनेक हवामान विभागांनी भाकीत व्यक्त केली होती़.  ती सर्व भाकीते मॉन्सूनने यंदा मोडीत काढली असून देशभरात आतापर्यंत सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडला आहे़ मात्र, त्याचे वितरण नेहमीप्रमाणे विषम राहिले असून ३६ पैकी ११ हवामान विभागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़. 

भारतीय हवामान विभागाने यंदा मॉन्सूनचा पाऊस ९६ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला होता़ सुधारित अंदाजातही त्यांनी पावसाचे अनुमान समाधानकारक असल्याचे म्हटले होते़.  त्यानुसार आता तीन महिने पूर्ण होत असताना देशात सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झाला आहे़. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात यंदा तुफान पाऊस कोसळला़ कोकणात सरासरीपेक्षा ३३ टक्के तर मध्य महाराष्ट्रात तब्बल ५४ टक्के पाऊस जादा झाला आहे़.  त्याचवेळी मराठवाड्यावर मॉन्सूनने वक्रदृष्टी ठेवली आहे़ मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे़. सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाला असून विदर्भात ४ टक्के पाऊस कमी झाला आहे़. देशभरातील २२ हवामान विभागात सर्वसाधारण पाऊस झाला असून हे देशातील एकूण क्षेत्रफळापैकी ६९ टक्के भुभाग व्यापते़ तर देशाचा १७ टक्के भुभाग असलेल्या ७ विभागात सरासरीच्या १२० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे़ तर १४ टक्के भुभागावरील ७ हवामान विभागात अत्यंत कमी पाऊस झाला़. मराठवाड्यातील औरंगाबाद -१८, बीड -४३, हिंगोली -३०, लातूर -३३, जालना -३३, नांदेड -१९, उस्मानाबाद - २६, परभणी -३९ टक्के पाऊस कमी झाला आहे़.  विदर्भातील यवतमाळ -३६, वाशिम - ३२, गोंदिया - १७ टक्के पाऊस कमी झाला हे़ विदर्भातील फक्त गडचिरोली जिल्ह्यात सरासरीच्या २४ टक्के पाऊस जादा झाला आहे़. पश्चिम बंगालच्या उपसागरात येत्या २ सप्टेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात आणि विदर्भात पुढील आठवड्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे़.   

टॅग्स :Rainपाऊसdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा